
कोल्हापूर : आम्ही कोणत्याही परिस्थितीत वीजबिल भरणार नाही. तुम्ही वीज कनेक्शन तोडून तरी दाखवा, असे आव्हान देत, 30 नोव्हेंबरपूर्वी वाढीव वीजबिलांसाठी संपूर्ण महाराष्ट्र बंदबाबत निर्णय घेण्यात येणार असल्याचा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी (Raju Shetti) यांनी दिला आहे.
वाढीव वीजबिलांबाबत संपूर्ण राज्यात आंदोलने झालीत. त्यानंतर ऊर्जामंत्री नितीन राऊत (Nitin Raut) यांनी दिवाळीला गोड बातमी देऊ, 100 युनिट पर्यंतच्या बिलात सवलत देऊ, असे म्हटले होते. मात्र, दिवाळीला त्यांनी कोणत्याही परिस्थितीत वीजबिल भरावेच लागेल, असे म्हटले. मात्र, कोणत्याही परिस्थितीत आम्ही वीजबिल भरणार नाही, हिम्मत असेल तर कनेक्शन तोडून दाखवा, असा इशारा राजू शेट्टी यांनी दिला. वीजबिलांबाबत कोल्हापुरात कृती समिती स्थापन करण्यात आली आहे. दोन दिवसांपूर्वी कोल्हापुरात लावलेल्या ‘वीजबिल भरणार नाही’ या डिजिटल फलकाची संपूर्ण राज्यात चर्चा सुरू आहे.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला