‘महाराष्ट्र मॉडेल’चे अनुकरण इतर राज्यांनी करावे ; गोएंकांकडून मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे कौतुक

harsh goenka - Uddhav Thackeray - Maharashtra today

मुंबई : राज्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लावण्यात आलेले कडक निर्बंध शिथिल करण्याबाबतचे आदेश जारी करण्यात आले असून उद्या, सोमवार ७ जूनपासून नव्या नियमावलीची अंमलबजावणी होईल. उद्योजक हर्ष गोएंका यांनी मुख्यमंत्र्यांच्या अनलॉक मॉडेलचं कौतुक केले आहे. गोएंका यांनी ट्विट करुन मुख्यमंत्र्यांचं कौतुक केलं आहे. तसेच, महाराष्ट्राचं हे मॉडेल इतर राज्यांनीही अनुकरण करायला हवं, असा सल्लाही त्यांनी दिला महाराष्ट्रात उद्यापासून हटविण्यात येत असलेल्या लॉकडाऊन मॉडेलचं देशातील इतरही राज्यांनी अनुकरण करायला हवं. अतिशय समजूतदारपणे आणि सायंटीफीक ग्रॅडेड मॉडेलचं हे महाराष्ट्र मॉडेल आहे, असे म्हणत हर्ष गोएंका यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे कौतुक केले .

लॉकडाऊन आणि क्नॉकडाऊन’मधला हा सुवर्णमध्य असल्याचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी अतिशय चांगल्या पद्धतीने समजावून सांगितले . कोरोनालाही रोखायचं आहे अन् अर्थव्यवस्थेलाही मजबूत करायचं आहे, असेही ते म्हणाले.

Disclaimer : बातमीत एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. महाराष्ट्र टुडेच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व महाराष्ट्र टुडे स्वीकारत नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button