अदर पुनावालांना शिवसेनेच्या गुंडांनी धमकी दिली; वृत्ताचे सुभाष देसाईने केले खंडन

Maharashtra today

मुंबई : शिवसेनेतील काही गुंडांनी(ShivSena goons) सिरमचे मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) अदर पुनावाला(Adar Poonawala) यांना धमकी दिली त्यामुळे ते परदेशात निघून गेले, असे वक्तव्य ‘इंडिया टुडे’ वृत्तवाहिनीचे सूत्रसंचालक राहुल कनवाल यांनी केले होते. शिवसेनेचे ज्येष्ठ नेते सुभाष देसाई(Subhash Desai) यांनी इंडिया टुडे समूहाला पत्र पाठवून या वक्तव्याचे खंडन केले असून राहुल कनवाल यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली.

पत्रात सुभाष देसाई यांनी म्हटले आहे की, राहुल कनवाल यांनी वृत्तवाहिनीवरील चर्चेदरम्यान अदर पुनावाला यांना शिवसेनेच्या गुंडांनी लसीसाठी धमकावल्याचे म्हटले. ही गोष्ट धादांत खोटी आणि बदनामीकारक आहे. शिवसेनेची प्रतिमा मलीन करण्याच्या कटाचा हा भाग वाटतो. कदाचित या माध्यमातून सध्या देशभरात सुरू असलेले कोरोनाचे थैमान आणि विधानसभा निवडणुकीच्या निकाल या विषयांवरील लक्ष दुसरीकडे वळवण्याचा प्रयत्न केला जात आहे. आमचा ‘इंडिया टुडे’ समूहाच्या पत्रकारितेवर विश्वास आहे. त्यामुळे राहुल कनवाल यांनी याबद्दल जाहीर माफी मागावी.

अदर पुनावाला सध्या परदेशात आहेत. काही दिवसांपूर्वी त्यांनी ‘टाईम्स’ या मासिकाला दिलेल्या मुलाखतीत धक्कादायक गौप्यस्फोट केला होता. करोनाच्या दुसऱ्या लाटेने भारतात निर्माण झालेल्या गंभीर परिस्थितीने आता उद्योजकांच्या मनात धडकी भरवली आहे. देशात सुरू असलेल्या लसीकरण मोहीमेत वापरल्या जाणाऱ्या ‘कोव्हीशील्ड’ लसींच्या मागणीसाठी भारतातील बडे नेते आणि काही राज्यांच्या मुख्यमंत्र्याकडून गंभीर स्वरूपाचे फोन कॉल्स येत असल्याचा दावा अदर पुनावाला यांनी केला होता.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button