शिवसेनेसारखे इतर पक्षांना जमले नाही, त्यामुळेच अनेक राज्यात आज चिता पेटलेल्या : संजय राऊतांच्या टोला

Sanjay Raut

मुंबई : राज्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने थैमान घातले आहे . मात्र आता महाराष्ट्रातील कोरोना परिस्थिती चांगली आहे. याउलट इतर राज्यांमधील पक्षांना ते जमलं नाही. त्यामुळे तिथे आज चिता पेटलेल्या आहेत, असा दावा शिवसेनेचे (Shivsena) संजय राऊत (Sanjay Raut) यांनी यावेळी केला.

आम्ही आतासुद्धा आदित्य ठाकरे यांच्यासोबत पुण्यामध्ये तीन कोविड सेंटरचं उद्घाटन केलं. हे सरकारी नाहीत. हे शिवसेनेच्या माध्यमातून उभी केली आहे. महारष्ट्राची स्थिती का चांगली आहे? तर सरकारला समांतर अशी कोविड सेंटर आणि यंत्रणा राजकीय कार्यकर्तेही उभे करत आहेत. त्यामुळे सरकारवरचा भार कमी होतोय. हे इतर राज्यात झालं नाही. अनेक राज्यांमध्ये शिवसेना सारखं इतर पक्षांना काम जमलं नाही. त्यामुळे अनेक राज्यांमध्ये आज चिता पेटलेल्या दिसत आहेत. आज कब्रस्तानात जागा नाही, ज्याचे चित्र जगात गेले आहेत, त्याचं कारण तेच आहे”, असे संजय राऊत म्हणाले.

महाराष्ट्र पॅटर्न किंवा महाराषट्र मॉडेल हा संदर्भ गेल्या महिन्याभरापासून वारंवार येतोय. याच महाराष्ट्र मॉडेलचा संदर्भ सर्वोच्च न्यायालयाने दिलाय. त्याच महाराष्ट्र मॉडेलवर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी बोलत आहेत. महाराष्ट्र या लढाईत पुढे आहे. महाराष्ट्राने स्वत:ची लढाई स्वत:च्या बळावर निर्माण केली आणि लढली. त्याचं श्रेय नक्कीच राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि त्यांच्या संपूर्ण सहकाऱ्यांना द्यावं लागेल , असे राऊत यावेळी म्हणाले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button