वरावरा राव यांना तुरुंगातून इस्पितळात हलविण्याचा आदेश

Order to transfer Varavara Rao from jail to hospital

मुंबई : भीमा-कोरेगाव हिंसाचार (Bhima Koregaon)प्रकरणी अटकेत असलेले ८१ वर्षांचे आरोपी वरावरा राव यांना संपूर्ण वैद्यकीय तपासणीसाठी तळोजा कारागृहातून नाणावटी इस्पितळात हलविण्याचा आदेश मुंबई उच्च न्यायालयाने बुधवारी दिला.

राव यांची प्रकृी खूपच ढासळली असल्याने त्यांना वैद्यकीय जामिनावर सोडावे यासाठी त्यांच्या कुटुंबियांनी केलेल्या याचिकेवर हा अंतरिम आदेश देताना न्या. संभाजी शिवाजी शिंदे व न्या. माधव जामदार यांच्या खंडपीठाने म्हटले की, हा आरोपी मरणासन्न अवस्थेत असल्याचे दिसते. अशावेळी त्याला वैद्यकीय उपचार मिळणे गरजेजे आहे. अशा वेळी त्याला इस्पितळात न हलविता आम्ही तळोजा कारागृहातच उपचार करू असे सरकार कसे काय म्हणू शकेल? संपूर्ण वैद्यकीय तपासणीसाठी त्याना १५ दिवसांसाठी नाणावटी इस्तिळात हलवा एवढेच आम्ही सांगत आहोत. पुढे काय करायचे ते आम्ही  नंतर पाहू.

राव यांच्या प्रकृतीच्या गांभीर्याचे नेमके निदान करण्यासाठी केवळ १५ मिनिटे त्यांनी ‘व्हिडिओ तपासणी’ करणे पुरेसे होणार नाही. त्यासाठी त्यांना जेथे तज्ज्ञ डॉक्टर आहेत अशाा इस्पितळातच हलवावे लागेल या राव यांच्यावतीने ज्योष्ठ वकील् िंिइंदिरा जयसिंग यांनी केलेल्या प्रतिपादनाशी खंडपीठाने सहमती दर्शवली.

न्यायालयास कळविल्याशिवाय राव यांना इस्पितळातून बाहेर काढले जाऊ नये. तसेच इस्पितळात कुटुंबियांना त्यांना भेटू दिले जावे, असेही निर्देश न्यायालयाने दिले.

राव यांना नाणावटी इस्पितळात हलविण्यास सरकारचा आक्षेप नाही, असे पब्लिक प्रॉसिक्युटर दीपक ठाकरे यांनी सांगितले. मात्र या प्रकरणाचा तपास करमाºया राष्ट्रीय तपासी यंत्रणेच्या () वतीन अतिरिक्त सॉलिसिटर जनर अनिल सिंग यांचे म्हणणे असे होते की, राव यांना नाणावटीऐवजी सरकारी जे. जे. इ्सिपतळात हलविण्यात यावे.

-अजित गोगटे

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER