उमर खालिदला तुरुंगातही सुरक्षा देण्याचा आदेश

Umar Khalid

नवी दिल्ली : वायव्य दिल्लीत गेल्या फेब्रुवारीत झालेल्या दंगलीच्या संदर्भात अटक करण्यात आलेला जवाहरलाल नंहरू विद्यापीठातील (JNU) विद्यार्थी नेता उमर खालिद यास १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी देत असतानाच येथील एका न्यायालयाने, खालिदच्या जीवाला कोणताही धोका पोहोचू नये, यासाठी त्याला तुरुंगातही पुरेशी सुरक्षा देण्याचा आदेश दिला.

प्रक्षोभक भाषणे करून दंगल भडकविल्याच्या आरोपांवरून १३ सप्टेंबर रोजी पोलिसांनी खालिदला अटक केली होती. ही दंगल पूर्व नियोजित होती व त्या कारस्थानात खलिदचाही हात होता, असाही पोलिसांचा दावा आहे.

आठवड्यातून दोन वेळा वकिलाला बेटू देणे, त्या भेटीच्या वेळी ईअरफोन वापरू देणे, तुरुंगातही स्वत:चा चष्मा जवळ बाळगू देणे व वाचण्यासाठी बाहेरून पुस्तके वगैरे मागवू देणे, अशा काही सवलती मिळण्यासाठी खालिदने अर्ज केला होता. त्यानुसार नियमाप्रमाणे ज्या सवलती देणे शक्य आहेत त्या द्याव्या, असे न्यायालयाने तुरुंग अधिकार्‍याना सांगितले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER