जावेद अख्तर यांच्या फिर्यादीवर कंगनाविरुद्ध तपासाचा आदेश

Javed Aktar & Kangana Ranaut

मुंबई : कवी आणि गीतकार जावेद अख्तर यांनी बॉलिवूडची अभिनेत्री कंगना राणावत हिच्याविरुद्ध दाखल केलेल्या बदनामीच्या फौजदारी फिर्यादीवर महानगर दंडाधिकाऱ्यांनी जुहू पोलिसांना तपासाचा आदेश दिला. अभिनेता सुशांत सिंग राजपूत यांच्या मृत्यू संदर्भात ‘रिपब्लिक टीव्ही’वर सादर झालेल्या कार्यक्रमात मुलाखत देताना कंगना हिने आपल्याबद्दल बदनामीकारक विधाने केली, अशी फिर्याद जावेद अख्तर यांनी दाखल केली होती.

अंधेरी येथील न्यायालयाचे अतिरिक्त महानगर दंडाधिकारी आर. आर. खान यांनी त्या फिर्यादीचा तपास करून १६ जानेवारीपर्यंत अहवाल सादर करण्याचा आदेश जुहू पोलिसांना शनिवारी दिला. ‘जावेद अख्तर हे बॉलिवूडमधील कथित ‘स्युईसाईड गँग’चे सदस्य असून काहीही केले तरी ही गँग सहीसलामत सुटू शकते. ’ असे विधान कंगनाने त्या मुलाखतीत केल्यावरून अख्तर यांनी ही फिर्याद दाखल केली आहे. जावेद यांच्यावतीने  युक्तिवाद करताना अ‍ॅड. निरंजन मुंदरगी म्हणाले की, कंगना हिने ती आणि अख्तर यांच्यात झालेल्या एका कथित संभाषणाचा हवाला देऊन ते विधान केले होते. ते संभाषण झाले तेव्हा एक डॉक्टरही तेथे हजर होते. त्यामुळे त्या डॉक्टरना साक्षीदार म्हणून बोलवावे किंवा पोलिसांना तरी तपास करण्यास सांगावे.

अजित गोगटे

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER