शाळांच्या शुल्कात ५० टक्के सवलतीचा वटहुकूम काढा – आ. अतुल भातखळकर

Atul Bhatkhalkar & Uddhav Thackeray

मुंबई : सर्वोच्च न्यायालयाच्या (Supreme Court) निर्देशाचे पालन करत आता तरी खाजगी शाळांच्या शुल्कात ५० टक्के सवलत देणारा निर्णय घेऊन तात्काळ वटहुकूम काढा, अशी मागणी आ. अतुल भातखळकर (Atul Bhatkhalkar) यांची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांना पत्र लिहून केली.

भातखळकर यांनी पत्रात म्हटले आहे की, कोरोनाच्या (Corona) साथीमुळे बहुसंख्य शाळा बंद असतानाही खाजगी शिक्षण संस्थां बस शुल्क, प्रयोगशाळा शुल्क, सत्र शुल्क, उपक्रम शुल्क, जिम शुल्क, क्रीडा शुल्क, शालेय शुल्क अजूनही सक्तीने वसूल करत आहेत.

हे योग्य नाही, असे मत व्यक्त करत ‘ऑनलाइन’ वर्ग सुरू असल्यामुळे शाळा चालविण्यास कमी खर्च येतो त्यामुळे खाजगी शाळांनी सक्तीची शुल्क वसुली थांबवून शुल्क कमी करावे असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने आज दिले आहेत. किमान सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशाचे पालन करत आता तरी खाजगी शाळांच्या शुल्कात ५० टक्के सवलत देणारा निर्णय घेऊन तात्काळ त्याबाबतीतला वटहुकूम काढा. गुजरात, मध्यप्रदेश, दिल्ली, उत्तर प्रदेश या राज्यांनी तेथील कायद्यात सुधारणा करून विद्यार्थांना शुल्कात ५० टक्यांपेक्षा जास्त सूट दिली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button