कोकण किनारपट्टीवर पुन्हा ऑरेंज अलर्ट

Kokan Rain-Orange Alert

मुंबई : रत्नागिरी जिल्ह्यासह कोकणातील अन्य जिल्ह्यात आज आणि उद्या मुसळधार पावासाची (Heavy Rain) शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. त्यानुसार जिल्हा प्रशासनाने कोकणातील सर्व किनारपट्टी भागात ‘ऑरेंज अलर्ट (Orange alert ) जारी केला आहे. दरम्यान, 30 ऑगस्ट रोजी कोकणात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडेल, असा इशारा देण्यात आला आहे. अरबी समुद्रात ताशी 55 कि. मी. वेगाने वारे वाहतील, असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला असल्याने कोकणातील जिल्हा प्रशासनांनी मच्छीमारासह सगरात न जाण्याचा इशारा दिला आहे.

तसेच किनारी भागासह दुर्गम भागात ऑरेंज अलर्ट जाहीर करताना खबरदारी घेण्याच्या सूचना केल्या आहे. पालघर, ठाणे ,रायगड आणि रत्नागिरी परिसरात शुक्रवारी आणि शनिवारी जोरदार पाऊस झाला. या पुढेही आगामी दोन दिवस कोकणात काही भागात जोरदार तर काही भागात मुसळधार पावसाची शक्यता आहे. अरबी सागराच्या पूर्व भागात कमी दाबाचे क्षेत्र सक्रीय आहे. त्याचा परिणाम वातावरणावर होण्याची शक्यता आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER