विरोधीपक्षाची नरमाईची भूमीका : शेट्टी

Raju Shetty

कोल्हापूर : गेल्या सहा महिन्यापासून शेतकरी लढत आहे. या विरोधीपक्षांचा तितका पाठींबा मिळत नाही, हे दुर्दैव आहे. कार्पोरेट हाउसेसच्या खिशात केंद्र सरकार असूनही विरोधीपक्ष त्याच्या विरोधात बोलण्याची हिंम्मत दाखवत नाही, हे मोठे आश्चर्य आहे. कोणी सोबत नाही आले, तरी शेतकऱ्यांची ही लढाई सुरुच राहिल, असे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक माजी खासदार राजू शेट्टी (Raju Shetty) यांनी कोल्हापुरात ट्रॅक्टर रॅलीस संबोधित करताना स्पष्ट केले.

शेट्टी म्हणाले, महामहीम राज्यपाल हे आमच्यावर लादले आहे. राज्यभरातून आलेल्या शेतकऱ्यांचे दु:ख ऐकायला वेळ नाही. मोर्चाची तारीख पूर्वीच ठरली होती. कष्टकरी समाजाच्या भावना ऐकूण न घेता, राज्यपाल गोव्याला गेले. गोव्याला ते पर्यटन की आणखी कशासाठी गेलेत हे माहिती नाही. विशिष्ट लोकांनी विशिष्ट लोकांसाठी चालवलेली राज्य व्यवस्था आहे का? असा प्रश्न यानिमित्ताने पडत आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER