विरोधकांना पुन्हा कलम ३७० लागू करायचा आहे, मोदींचा विरोधकांवर आरोप

सासाराम : पंतप्रधान मोदी (PM Modi) यांची आज बिहार निवडणुकीसाठी पहिली सभा होत आहे. यावेळी पंतप्रधान मोदींनी वेगवेगळ्या मुद्द्यांना हात घातला. पंतप्रधान मोदींनी विविध मुद्द्यांवर विरोधकांना लक्ष्य केलं. एनडीए (NDA) सरकारनं जम्मू काश्मीरमधील कलम ३७० (Article-370) हटवलं. आम्ही सत्तेत आलो तर पुन्हा जम्मू काश्मीरमध्ये कलम ३७० लागू करू, असं विरोधक म्हणतात आणि वर बिहारमध्ये येऊन इथल्या जनतेकडे मतं मागण्याची हिंमत करतात. हा बिहारमधील जनतेचा अपमान नाही का?’, असा सवाल मोदींनी उपस्थित केला. बिहार आपल्या सुपुत्रांना देशाच्या संरक्षणासाठी सीमेवर पाठवतो. पण कलम ३७० पुन्हा आणू म्हणून विरोधक त्या सुपुत्रांचा आणि बिहारचा अपमान करतात, विरोधकांना हा निर्णय उलटवायचा आहे. अशी टीका पंतप्रधान मोदींनी केली.

यावेळी मोदी म्हणाले की, ‘त्यांना सत्तेतून खाली आणलं तर या लोकांना आता काय करावे असं झालं आहे. राजदने १० वर्ष यूपीए सरकारचा भाग असताना बिहारच्या लोकांवर राग काढला. राजदने नीतीशकुमारांचे १० वर्ष बेकार केले. जेव्हा नंतर १८ महिन्यासाठी सरकार बनली. तेव्हा परिवाराने काय-काय खेळ नाही खेळले हे सगळ्यांना माहित आहे. जेव्हा नितीशजींना ही गोष्ट कळाली त्यांनी सत्ता सोडण्याचा निर्णय घेतला. बिहारच्या भविष्यासाठी आम्ही पुन्हा नितीशजी सोबत आलो. मी पंतप्रधान झाल्यानंतर बिहार आणि दिल्ली सरकारने तीन वर्ष एकत्र काम केलं. आता आमचं सरकार आत्मनिर्भर बिहारचं निर्माण करणार आहे.

दरम्यान, मोदींनी त्यांच्या भाषणात दिवंगत माजी केंद्रीय मंत्री राम विलास पासवान आणि रघुवंश प्रसाद सिंह यांना आदरांजली वाहिली. ‘बिहारनं आपले दोन सुपुत्र गमावले. राम विलास पासवान यांना माझ्याकडून भावपूर्ण श्रद्धांजली. ते शेवटच्या श्वासापर्यंत माझ्यासोबत होते. त्यांनी संपूर्ण आयुष्य गरीब आणि दलितांसाठी खर्ची घातलं. रघुवंश प्रसाद सिंह यांनीही आयुष्यभर गरिबांसाठी काम केलं. त्यांनाही मी श्रद्धांजली वाहतो,’ अशा शब्दांत मोदींनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER