सोमय्यांनी खोटे आरोप करत जुनी थडगी उकरु नयेत, अन्यथा….; संजय राऊतांचा इशारा

Sanjay Raut - Kirit Somaiya

मुंबई : किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी खोटे-नाटे आरोप करणं बंद करावं. तसेच जुनी थडगी त्यांनी उकरुन काढून नयेत, कारण आम्हालाही थडगी उकरतात येतात. पण आम्ही ती उकरली तर त्यात तुमच्या पापांचेच सांगाडे जास्त सापडतील, असा इशारा शिवसेना (Shiv Sena) खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी दिला आहे. सोमय्या यांना त्यांच्या पक्षातच गांभीर्याने घेतले जात नाही, असा टोलाही त्यांनी लगावला.

महाराष्ट्रातील सरकार पाडण्यासाठी विरोधकांनी वर्षभरात अनेक ऑपरेशन करण्याचा प्रयत्न केला पण सरकारला थोडंही खरचटलं नाही. असे अघोरी प्रयत्न त्यांनी केले. त्यामुळे त्यांनी ही भाषा बंद केली पाहिजे आणि महाराष्ट्रासाठी कल्याणासाठी सहकार्याची भावना ठेवावी, असे राऊत म्हणाले.

दरम्यान सोमय्यां यांनी आम्ही काही बोलावं अस कोणतंही महान त्यांनी केलेलं नाही. ते जे करतात त्याच्याकडे त्यांचा पक्षही गांभीर्याने पाहत नाही. यामुळे अशा विधानांमुळे आपल्याच पक्षावरील लोकांचा विश्वास उडतो याचं त्यांनी भान ठेवावं. हे खोटे नाटे आरोप करणं बंद करावं, जुनी थडगी उकरायची म्हटले तर आम्हालाही उकरता येतात. ती आम्ही उकरली तर त्यात तुमच्याच पापांचे सांगाडे जास्त सापडतील. मला वेडं ठरवण्यासाठी संजय राऊत आणि शिवसेना नेत्यांमध्ये स्पर्धा लागली आहे, त्यांना माझ्या शुभेच्छा, असे सोमय्या यांनी म्हटले होते . यावर राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER