विधानपरिषदेसाठी खडसे शेट्टींसह आठ जणांच्या नावांना विरोध ; हायकोर्टात आव्हान

Raju Shetti - Eknath Khadse

मुंबई : नुकताच राष्ट्रवादीचा झेंडा हाती घेतलेले राष्ट्रवादीचे दिग्गज नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी (Raju Shetti) यांच्यासह आठ नावांना राज्यपाल निर्देशित सदस्यांच्या नियुक्तीला हायकोर्टात आव्हान देणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. कला किंवा सामाजिक क्षेत्रातील व्यक्तींच्या नियुक्तीचे निकष असताना राजकीय नेत्यांची वर्णी लावल्याचा दोष ठेवत दोघा सामाजिक कार्यकर्त्यांनी हायकोर्टाचे दरवाजे ठोठावले आहेत.

एकनाथ खडसे, राजू शेट्टी यांच्यासह राजू भिंगे, रजनी पाटील, सचिन सावंत, सय्यद मुजफ्फर हुसेन, विजय करंजकर, चंद्रकांत रघुवंशी या आठ जणांना याचिकेत प्रतिवादी करण्यात आलं आहे. खडसे-शेट्टी यांच्यासह आठही जणांची राज्यपाल नियुक्त आमदारकीच्या कोट्यातून विधानपरिषदेवर नियुक्ती करण्याला या याचिकेतून विरोध करण्यात आला आहे.

राज्यपालांना 12 जणांना विधान परिषदेवर आमदार म्हणून नियुक्त करण्याचा अधिकार आहे. मात्र या नियुक्त्या करताना शिक्षण, कला, सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तींची नियुक्ती करावी, अशी प्रथा आहे. परंतु या क्षेत्रातील व्यक्तींची निवड न करता राजकीय व्यक्तींची नियुक्ती केली जात असते. याबाबत सामाजिक कार्यकर्ते दिलीप आवळे आणि शिवाजी पाटील यांनी काही दिवसांपूर्वी मुंबई हायकोर्टात याचिका दाखल केली.

या याचिकेच्या अनुषंगाने याचिकाकर्त्यांचे वकील सतीश तळेकर यांनी काल झालेल्या सुनावणीच्या वेळी हायकोर्टात एक नवा अर्ज सादर केला. राज्य सरकारने राज्यपालांकडे शिफारस केलेल्या 12 जणांपैकी आठ जणांच्या नियुक्तीला या अर्जाद्वारे विरोध केला आहे. आठ जणांना याचिकेत प्रतिवादी करण्यात आलं आहे.

अभिनेत्री उर्मिला मातोंडकर, गायक आनंद शिंदे, कवी अनिरुद्ध वनकर, व्याख्याते नितीन बानुगडे पाटील हे कला, सामाजिक क्षेत्रातील मान्यवर आहेत. मात्र भाजपमधून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आलेले एकनाथ खडसे, राजू शेट्टी यांच्यासह राजू भिंगे, रजनी पाटील, सचिन सावंत, सय्यद मुजफ्फर हुसेन, विजय करंजकर, चंद्रकांत रघुवंशी हे आठ जण राजकीय नेते असल्याने त्यांच्या नियुक्तीला आव्हान देण्यात आलं आहे.

12 सदस्यांमध्ये राज्यपालांना दिलेली नावे खालीलप्रमाणे –

काँग्रेस (Congress)

1) सचिन सावंत – सहकार आणि समाजसेवा
2) रजनी पाटील – सहकार आणि समाजसेवा
3) मुजफ्फर हुसैन – समाजसेवा
4) अनिरुद्ध वनकर – कला

राष्ट्रवादी काँग्रेस (NCP)

1) एकनाथ खडसे – सहकार आणि समाजसेवा
2) राजू शेट्टी – सहकार आणि समाजसेवा
3) यशपाल भिंगे – साहित्य
4) आनंद शिंदे – कला

शिवसेना (Shiv Sena)

1) उर्मिला मातोंडकर – कला
2) नितीन बानगुडे पाटील
3) विजय करंजकर
4) चंद्रकांत रघुवंशी

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER