राष्ट्रवादीत भरतीला विरोध : आम्हाला दुसरा विचार करावा लागेल; तालुकाध्यक्षाचा इशारा

Sharad Pawar

हातकणंगले : ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. यानंतर राष्ट्रवादीमध्ये मेगा भरती सुरू झाल्याचे दिसते. त्यांच्या पाठोपाठ भाजपा नेते व माजी खासदार जयसिंगराव गायकवाड यांनी देखील राष्ट्रवादीची वाट धरली. तर, काही दिवसांपूर्वीच हातकणंगलेचे माजी आमदार राजीव आवळे यांनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला. या भरतीमुळे पक्षातील जुने कार्यकर्ते अस्वस्थ झाले असून हातकंगणले राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष लखन बेनाडे यांनी पक्षाच्या नेत्यांना इशारा दिला, पक्षश्रेष्ठींनी विचार करावा अन्यथा आम्हाला दुसरा विचार करावा लागेल.

सुमारे आठवड्यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेश कार्यालयात आवळेंचा पक्षप्रवेश पार पडला होता. माजी आमदार राजीव आवळे यांच्यासोबत इचलकरंजी नगरपरिषदेचे सदस्य अब्राहम आवळे, वडगाव नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष आणि कॉंग्रेसचे नेते रामभाऊ सूर्यवंशी, कबनूरचे भाजपा शहराध्यक्ष सुधाकर कुलकर्णी, भाजपाचे नितिन कामत, बाबू पतोरी, दिनेश डायमा, पिंपरी-चिंचवड येथील लहुजी सेनेचे युवराज दाखले, वडगाव नगरपरिषदेच्या माजी नगराध्यक्षा लता सूर्यवंशी यांनीही राष्ट्रवादीत प्रवेश केला.

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि मंत्री जयंत पाटील, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या या प्रवेशानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये धुसफूस निर्माण झाली आहे. ‘पक्षश्रेष्ठींनी विचार करावा अन्यथा आम्हाला दुसरा विचार करावा लागेल’ असा इशाराच हातकंगणले राष्ट्रवादी काँग्रेस तालुकाध्यक्ष लखन बेनाडे यांनी दिला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER