
मुंबई : राज्यात कोरोनाचे (Corona) संकट दिवसेंदिवस वाढतच चालले आहे. यात पुन्हा एकदा संपूर्ण लॉकडाऊन (Lockdown in Maharashtra) जाहीर होणार का याविषयी तर्कवितर्क सुरू असतानाच सत्ताधारी महाविकास आघाडीमधील काँग्रेस (Congress) आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) प्रमुख मंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांकडे एक मागणी केली असल्याची सूत्रांनी माहिती दिली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसमधील प्रमुख काही मंत्र्यांनी राज्यातील आर्थिक स्थिती लक्षात घेता संपूर्ण लॉकडाऊन जाहीर करू नये, अशी भूमिका मांडल्याचे समजते. अर्थात याबाबत आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) नेमकी काय भूमिका घेणार याकडे लक्ष आहे. ‘राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात कोरोना रुग्ण आढळत आहेत.
ज्या भागात कोरोनाचा अतिप्रादुर्भाव आहे अशा भागांमध्ये फक्त अधिक कडक नियमावली केली जावी, संपूर्ण राज्यामध्ये लॉकडाऊन जाहीर केला तर मोठ्या प्रमाणात नाराजी लोकांमध्ये वाढेल. तूर्तास जितके शक्य आहे तोपर्यंत तरी संपूर्ण राज्यात लॉकडाऊन जाहीर करू नये. ’ अशी मागणी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील वरिष्ठ मंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला