‘कंगनाला विरोध म्हणजे दाल में कुछ काला है’, चंद्रकांत पाटलांचा उद्धव ठाकरेंवर निशाणा

Chandkant Patil -Uddhav Thackeray

मुंबई : शिवसेना (Shivsena) नेते खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांना प्रत्युत्तर देताना अभिनेत्री कंगना रणौत (Kangana Ranaut) हिनं मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीरशी केली होती. या वक्त्यव्यानंतर चांगलाच वाद निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर विरोधकांनी ठाकरे सरकारवर (Thackeray Govt) निशाणा साधला .

बॉलिवूडमधील ड्रग्स कनेक्शन उघड होऊ नये म्हणूनच कंगनाला विरोध केला जातो आहे. म्हणजेच दाल मे कुछ काला है आणि त्याची चर्चा चहा पितांना होत असणार असे म्हणत चंद्रकांत पाटलांनी (Chandrakant Patil) नाव न घेता उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या कुटुंबियांवर टीकास्त्र सोडले .

पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांच्या वाढदिवसानिमित्त पिंपरी भाजप तर्फे घेतल्या गेलेल्या सेवा सप्ताहाच्या निमित्ताने अपंगांना आर्थिक मदत आणि वस्तूंच्या वाटप कार्यक्रमासाठी चंद्रकांत पाटील आले होते. यावेळी त्यांनी मोदी कसे आत्मनिर्भर आहेत या बद्दलचा किस्सा सांगताना मोदी त्यांना मिळालेल्या भेट वस्तूंचा लिलाव करत असल्याचेही सांगितले .

ही बातमी पण वाचा : मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना रावणाची उपमा देत कंगना म्हणाली, धैर्याने पुढे जात राहीन

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER