कृषी कायद्याला विरोध ; राजकीय फायद्याचं जुगाड करण्यासाठीच शेट्टींचा प्रयत्न ?

Raju Shetty

पुणे : दिल्लीत सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनावरून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी (Raju Shetty) यांनी केंद्र सरकारवर नवा आरोप केला आहे. अदानी आणि अंबानी या उद्योगपतींना लॉकडाऊन काळातील तोटा भरून काढता यावा म्हणून शेतकऱ्यांच्या माथी कृषी विधेयके मारण्यात आली आहेत, असा आरोप राजू शेट्टी यांनी केला आहे. आधी केंद्र सरकारच्या अध्यादेशातील अनेक मुद्द्यांना पाठिंबा दिल्यानंतर आता कृषी कायदाच मागे घेण्याची भूमिका शेट्टी यांनी घेतल्याने आश्चर्य व्यक्त केले  जात आहे.

राजकीय फायद्याचं जुगाड करण्यासाठीच शेट्टींचा प्रयत्न सुरू असल्याचं राजकीय वर्तुळात बोललं जात आहे. (is Swabhimani Shetkari Sanghatana chief raju shetty oppose farm law for political benefits?) राजू शेट्टी यांनी आज पत्रकार परिषद घेऊन कृषी कायदा आणि शेतकरी आंदोलनावरून भूमिका मांडली. कृषी क्षेत्रात अदानी आणि अंबानींना व्यापार करता यावा तसेच त्यांना कोरोना काळात  झालेला तोटा भरून काढता यावा म्हणून तीन कृषी विधेयके   शेतकऱ्यांच्या माथी मारण्यात आली  आहेत. देशातील एका शेतकऱ्याने किंवा शेतकरी संघटनांनी कोणत्याही कायद्याची मागणी न करता केंद्र सरकारने हे कायदे तयार केल्याचा दावा राजू शेट्टी यांनी केला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER