कृषी कायद्यांचा विरोध : राष्ट्रवादी करणार आंदोलन, शरद पवार घेणार भाग

Sharad Pawar

मुंबई : नव्या कृषी कायद्यांविरोधात दिल्लीत सुरू असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस २३ ते २५ जानेवारी आझाद मैदान येथे आंदोलन करणार आहे. या आंदोलनात राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार भाग घेतील, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांनी दिली. शरद पवार (Sharad Pawar) २५ जानेवारी रोजी आंदोलनात सहभागी होतील असे त्यांनी पत्रकारांना सांगितलं.

शेतकरी आंदोलनाला (Famers Protest) राष्ट्रवादीने पाठिंबा दिला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने कृषी कायद्याला विरोध केला आहे. या आंदोलनात महाविकास आघाडीचे तिन्ही पक्ष आणि त्यांचे नेते व मुख्यमंत्रीही सहभागी होणार आहेत असेही नवाब मलिक म्हणालेत.

देशातील विरोधी पक्ष शेतकऱ्यांच्यासोबत असून आगामी काळात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह राज्य मंत्रिमंडळातील मंत्री कृषी कायद्यांविरोधातील आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी रस्त्यावर उतरतील, असे त्यांनी सांगितले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER