सीएए विरोधातील महामोर्चाच्या संयोजकांनी मानले मुश्रीफ आणि सतेज पाटलांचे आभार

Satej Patil, Hassan Mushrif

कोल्हापूर : सीएए आणि एनआरसी विरोधात आज, सोमवारी दसरा चौकातून महामोर्चा काढण्यात आला होता. या मोर्चात सर्वधर्मीयांचा सहभाग असल्याचा दावा संयोजकांनी केला असला तरी मोर्चात बहूसंख्य मुस्लिम समाज सहभागी झाला होता. संविधान बचाव देश बचाव कृती समितीने या मोर्चाचे आयोजन केले होते. मोर्चात कोणीही राजकीय नेता सहभागी झाला नसला तरी या मोर्चाच्या मागे नामदार हसन मुश्रीफ आणि सतेज पाटील असल्याचा गौप्यस्फोट झाला. मोर्चेकऱ्यांनी समारोपप्रसंगी सतेज पाटील आणि मुश्रीफ यांचे आभार मानल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. दसरा चौकात प्रा. डॉ. एन. डी. पाटील, भाषाशास्त्रज्ञ डॉ. गणेश देवी, श्रीमंत छत्रपती शाहू महाराज, डॉ. जयसिंगराव पवार, अमृता पाठक यांची भाषणे झाली.

मोचोच्या समारोप प्रसंगी मुस्मिल बोर्डींगचे चेअरमन गणी आजरेकर म्हणाले, या मोर्चाला गृहराज्यमंत्री सतेज पाटील, मंत्री हसन मुश्रीफ, मंत्री राजेंद्र पाटील यड्रवकर यांना विधानसभेच्या अधिवेशनामुळे उपस्थित राहता आले नसले तरी त्यांनी या मोर्चाला याआधी पाठिंबा व्यक्त करून मोठे सहकार्य केले आहे. त्यांचे आंदोलकांतर्फे आभार मानत आहे.

यावेळी उपमहापौर संजय मोहिते, भरत रसाळे, ऍड गुलाबराव घोरपडे, ऍड अशोकराव साळोखे, ए वाय पाटील, संभाजीराव जगदाळे, रमेश मोरे, सतीश कांबळे, प्रा. विश्वास दवंशमुख, कैस बागवान, हाफिज मुसा, सदा मलाबादे, चंद्रकांत पाटील, सरला पाटील, डॉ मेघा पानसरे, शिवाजी माळी, सुनीता पाटील, वैशाली महाडीक, व्यंकप्पा भोसले, राहित खान, मौलाना इरफान, मुफ्ती गुफरान, कादर मलबारी, आदिल फरास, संदीप कवाळे, अशोक जाधव उपस्थित होते. स्वागत माजी महापौर आर के पोवार यांनी तर प्रस्तावना कॉम्रेड चंद्रकांत यादव यांनी केली.