विरोधी पक्षनेत्यांनी मुख्यमंत्र्यांना सल्ला द्यावा; संजय राऊतांचा टोला

Sanjay Raut-CM Uddhav Thackeray-Devendra Fadnavis

मुंबई :- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी दिल्लीत जाऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांची भेट घेतली. त्यांच्या व्यक्तिगत भेटीनंतर राज्याच्या राजकारणात चर्चेला उधाण आले आहे. यावर आता विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. तसेच शिवसेना नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांच्यावर पलटवार केला आहे. यावेळी संजय राऊत माध्यमांशी बोलत होते.

‘पंतप्रधानांच्या भेटीला विरोधी पक्षाला नेले असते तर आनंद झाला असता.’ असे फडणवीस म्हणाले. यावर पलटवार करत शिवसेना नेते संजय राऊत म्हणाले की, विरोधी पक्ष सोबत असल्यावरच मदत मिळत असेल तर तसे केंद्राने जाहीर करावे, असा टोला त्यांनी लगावला. राज्याला मदत मिळावी, यासाठी मुख्यमंत्री काल दिल्लीला गेले.

या भेटीकडे सकारात्मक दृष्टीने पाहायला हवे. मेट्रो कारशेड अडकली आहे. याबाबतची मागणी मुख्यमंत्र्यांनी केली आहे. यावर सकारात्मक चर्चा झाली. विरोधी पक्षाने या भेटीचे स्वागत करायला पाहिजे, असे ते म्हणाले. केंद्रात त्यांच्याच पक्षाचे सरकार आहे. काही गोष्टी सरकारी असतात आणि त्या केंद्राकडे न्याव्या लागतात. विरोधी पक्षनेते जाणकार आहेत. याबाबत विरोधी पक्षाने मुख्यमंत्र्यांना सल्ला आणि सूचना द्यायला हव्यात. राज्याच्या प्रश्नांवर भाजप चिंतन करत असेल तर त्यांच्या बैठकीचे स्वागत आहे, असेही राऊत म्हणाले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button