सोनिया गांधी, पवारांसह विरोधी पक्षनेत्यांकडून मोदींना घेरण्याची तयारी; केली ‘ही’ मागणी

Sharad Pawar - Sonia Gandhi - CM Uddhav Thackeray - PM Narendra Modi
Sharad Pawar - Sonia Gandhi - CM Uddhav Thackeray - PM Narendra Modi

नवी दिल्ली :- बंगालच्या निवडणुकीतील अपयशामुळे भाजपचा (BJP) अपेक्षाभंग झाला. आता विरोधी पक्षाने केंद्रातील मोदी सरकारला (Modi Government) घेरण्याचे प्रयत्न सुरू केले आहे. कॉंग्रेस (Congress) अध्यक्ष सोनिया गांधी (Sonia Gandhi), राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्यासह १३ विरोधी पक्षांतील नेत्यांनी संयुक्त पत्र पाठवून मोदी सरकारची डोकेदुखी वाढवली आहे.

विरोधी पक्षांतील प्रमुख नेत्यांनी रविवारी केंद्र सरकारला देशभरातील सर्व रुग्णालयांमध्ये ऑक्सिजनचा अखंडित पुरवठा आणि मोफत लसीकरण कार्यक्रम सुनिश्चित करण्याची विनंती केली. सोनिया गांधी, माजी पंतप्रधान एच.डी. देवगौडा, शरद पवार, शिवसेना पक्षप्रमुख आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray), तृणमूल कॉंग्रेसच्या (Trinamool Congress) प्रमुख आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banerjee), झामुमचे नेते आणि झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन, द्रमुक नेते एमके स्टालिन, बसपाप्रमुख मायावती, समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव, भाकपचे सरचिटणीस डी. राजा आणि सीताराम येचुरी यांनी एक संयुक्त पत्र पाठवून ही मागणी केली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button