आपण आजन्म आमदार, खासदार असल्याच्या थाटात राहून चालत नाही – देवेंद्र फडणवीसांचा सल्ला

Devendra Fadnavis

पुणे :- राजकीय व्यक्तीचे आयुष्य पाच वर्षांचे असल्याने नेत्याला पाच वर्षांनी जनतेसमोर जावे लागते. आपण आजन्म आमदार, खासदार असल्याच्या थाटात राहून चालत नाही, असे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी म्हटले आहे.

शिवाजीनगरचे आमदार सिद्धार्थ शिरोळे यांच्या प्रथम वर्ष कार्य अहवालाचे प्रकाशन देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते.

समाजाने कसोटीच्या क्षणांसाठी नेत्याला विश्वासाने पुढारलेपण दिलेले असते. नेत्याला आत्मविश्वास नसेल तर समाजाने कोणाकडे पाहायचे? फलक लावून दादा-भाऊ होणारे खूप झाले आहेत. पण अशाने नेता होता येत नाही, असं फडणवीसांनी सांगितले .

आमचे नेते पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) प्रधानसेवक असतील तर आम्ही कोणीच मालकाच्या भूमिकेत जाऊ शकत नाही. लोकप्रतिनिधी या सेवकाने मालक असलेल्या जनतेप्रति उत्तरदायी असलं पाहिजे, असेही फडणवीस म्हणाले.

ही बातमी पण वाचा : निवडणूक येताच शिवसेनेला औरंगाबादच्या नामकरणाचा प्रस्ताव आठवतो – देवेंद्र फडणवीस

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER