विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची कोरोनावर मात, रुग्णालयातून डिस्चार्ज

Devendra Fadnavis defeated Corona

मुंबई :- महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी कोरोनावर मात केली आहे. आज त्यांचा कोरोना चाचणीचा अहवाल निगेटिव्ह आला असून, त्यांना सेंट जॉर्ज रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला.

देवेंद्र फडणवीस यांना २4 ऑक्टोबर रोजी कोरोना (Corona) झाल्याचं निष्पन्न झालं होत. फडणवीस यांनी करोनाची लागण झाल्यानंतर सरकारी रुग्णालयांत जाण्याचा निर्णय घेतल्यानं सगळ्यांनीच आश्चर्य व्यक्त केलं होत. मुंबईच्या सेंट जॉर्ज रुग्णालयात त्यांना दाखल करण्यात आले होते. जवळपास १० दिवस उपचार घेतल्यानंतर आज फडणवीस यांची कोरोना चाचणी निगेटिव्ह आली. त्यानंतर त्यांना डिस्चार्जही देण्यात आला. मात्र असे असले तरी, ते काही दिवस घरातूनच काम करणार आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER