अस्तित्वाच्या लढ्यासाठी विरोधकांची शेतकरी आंदोलनात उडी; रविशंकर प्रसाद यांची टीका

ravishankarprasad

नवी दिल्ली : शेतकरी आंदोलनात उद्या (८ दिसेंबर) ला भारत बंदचे आवाहन करण्यात आले आहे. या बंदला पाठिंबा घोषित करून विरोधी पक्षही आंदोलन करणार आहेत. यावर टीका करताना केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद (Ravishankar Prasad) म्हणालेत, ‘शेतकरी आंदोलक नेत्यांनी स्पष्टपणे म्हटलं आहे की, राजकीय लोकांनी आमच्या आंदोलनात सहभागी होऊ नये. आम्ही त्यांच्या भावनांचा आदर करतो. परंतु, तरिही हे सर्व उड्या मारत आहेत. कारण त्यांना भाजपा आणि नरेंद्र मोदी यांना विरोध करण्याची संधी मिळाली आहे.’

केंद्र सरकारच्या कृषी कायद्याविरोधात शेतकऱ्यांनी दिल्लीला वेढा दिला असून ८ डिसेंबरला देशव्यापी बंदची हाक दिली आहे. विरोधपक्षांनी च्या वतीनेही शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा दर्शवण्यात येत आहे. यावर रविशंकर प्रसाद यांनी विरोधी पक्षांवर टीका केली – शेतकरी आंदोलनात सहभागी झालेल्या विरोधी पक्षांची दुहेरी आणि लज्जास्पद वृत्ती उघड झाली आहे. विरोधी पक्ष राजकीय हेतू साध्य करण्यासाठी आंदोलनात सहभागी झाले आहेत. विरोधी पक्षांचं काम केवळ मोदी सरकारला विरोध करणे एवढेच आहे.

आम्ही विरोधी पक्ष, मुख्यत्वे काँग्रेस, राष्ट्रवादी आणि त्यांच्यासोबत असलेल्या इतर पक्षांच्या लज्जास्पद दुहेरी मानसिकता देशासमोर आणण्यासाठी पुढे आलो आहोत. यांचे राजकीय अस्तित्व संपत आले आहे, त्यामुळे ते कोणत्याही सरकार विरोधी आंदोलनात सहभागी होत आहेत. जे आम्ही केले, यूपीए सरकारही तेच करत होती, असे रविशंकर प्रसाद म्हणाले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER