विरोधक दंगली घडवीत आहेत : अमित शहा

भुवनेश्वर :- केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी नागरिकत्व सुधारणा कायद्यावरून आज शुक्रवारी विरोधी पक्षांवर घणाघात केला. सीएएवरून जनतेत संभ्रम पसरवून विरोधक दंगली घडवून आणीत असल्याचा आरोप अमित शहा यांनी केला. भुवनेश्वर येथील सभेत बोलताना त्यांनी हा आरोप केला.

सीएएच्या कुठल्या कलमात नागरिकता हिरावून घेण्याचे नमूद केले आहे, ते दाखवा, असे आव्हानही यावेळी शहा यांनी विरोधी पक्षांना दिले. सीएए लोकांची नागरिकता हिरावणार नसून, नागरिकता देणार आहे, हे लक्षात घ्या, असे शहा यावेळी म्हणाले.