तर कोल्हापूरातूनही मुख्यमंत्री आणू, गोव्यातील मृत्यूतांडवानंतर मुख्यमंत्री बदलाची मागणी

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून ऑक्सिजनअभावी गोव्यात (Goa) कोरोना (Corona Virus) रुग्णांच्या मृत्यू झाल्याच्या घटना घडल्या आहेत. त्यावरुन आता राज्य सरकारला कोंडीत पकडण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत. काही दिवसांपूर्वीच गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत आणि आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांच्यातील अंतर्गत वाद पुढे आला होता. त्यानंतर आता विरोधकांनी मुख्यमंत्री प्रमोद सावंत (CM Pramod Sawant) यांच्या राजीनाम्याची मागणी उचलून धरली आहे.

गोव्याच्या मुख्यमंत्र्यांचा राजीनामा घेऊन पूर्ण कारभार टास्क फोर्सकडे सोपवण्यात यावी, अशी मागणी गोवा फॉरवर्ड पक्षाचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री विजय सरदेसाई यांनी केली आहे. गोव्यात शनिवारी पहाटे ऑक्सिजनअभावी आणखी १३ जणांचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती. आतापर्यंत ऑक्सिजनअभावी ८३ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. या पार्श्वभूमीवर विजय सरदेसाई यांनी मुख्यमंत्री आणि आरोग्यमंत्र्यांना लक्ष्य केले आहे. ऑक्सिजनअभावी रुग्णांच्या होणाऱ्या मृत्यूसाठी सर्वस्वी मुख्यमंत्री आणि आरोग्यमंत्रीच जबाबदार आहेत. गोवा सरकार पैसे कमावण्यात आणि उधळण्यात व्यस्त झाले आहे. मुख्यमंत्री आणि आरोग्यमंत्र्यांमध्ये कुठलाही समन्वय राहिलेला नाही. ऑक्सिजन टँकरसाठी प्रशिक्षित ड्रायव्हर जर कोल्हापूरमधून आणावे लागत असतील तर मुख्यमंत्रीही कोल्हापुरातूनच आणावा, अशी खोचक टिप्पणी विजय सरदेसाई यांनी केली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button