राजकीय पोळी भाजून घेण्यासाठी विरोधकांचा कृषी विधेयकांना विरोध – चंद्रकांत पाटलांची टीका

Chandrakant Patil

मुंबई : केंद्र सरकार कृषि क्षेत्राशी संबंधित तीन विधेयक संसदेत मांडली असून, त्यापैकी दोन विधेयके संसदेच्या (Bills of Parliament) दोन्ही सभागृहात मंजूर करण्यात आली आहे. मात्र केवळ राजकारण करत राजकीय पोळी भाजून घेण्यासाठी एक-दोन राजकीय पक्ष केंद्र सरकारच्या कृषी विधेयकांना विरोध करत आहेत, अशी टीका भाजपचे (BJP) प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी केली . कोल्हापूरमध्ये पत्रकार परिषदेत ते बोलत होते .

आपापल्या पक्षांच्या जाहीरनाम्यात दरवेळी हेच मुद्दे सामील करून देखील ते लागू करण्याची राजकीय इच्छाशक्ती या पक्षांकडे नव्हती. ते करण्याचे धाडस त्यांच्याकडे नव्हते , असेही पाटील म्हणाले .या विधेयकांमुळे कृषीक्षेत्र नियंत्रण मुक्त होणार असून आणि शेतक-यांच्या जीवनात आमूलाग्र बदल घडून त्यांना त्यांच्या शेतमालाला योग्य भाव मिळून त्यांचे जीवनमान उंचावणार आहे,असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे.

पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारने दोन विधेयकांच्या माध्यमातून कृषीक्षेत्रात क्रांतिकारी परिवर्तन घडवून आणण्याचा मार्ग प्रशस्त केला आहे,असे पाटील म्हणाले .

तसेच सन २०२२ पर्यंत शेतक-यांचे उत्पन्न दुप्पट करण्याच्या दिशेने केंद्र सरकार ठोस पावले उचलत आहे. कृषी प्रधान देशातील शेतक-यांच्या जीवनाची दिशा आणि दशा या दोन्हींमध्ये सकारात्मक बदल घडवून आणणा-या या निर्णयासाठी मोदी आणि कृषी मंत्री नरेंद्रसिंह तोमर यांचे आभार मानले पाहिजेत. मोदी यांच्या नेतृत्वाखाली शेतक-यांच्या खांद्याला खांदा लावून भारत सरकार, कृषी मंत्रालय आणि कृषी तज्ज्ञ यांनी हे ध्येय पूर्ण करण्याचा विडा उचलला आहे. आत्मनिर्भर भारत अभियांनांतर्गत१ लाख कोटी रुपयांचा कृषी पायाभूत सुविधा निधी असो वा देशभरात १० हजार कृषी उत्पादक संघ (एफपीओ ) निर्माणाचा निर्णय असो, केंद्र सरकारने देशातील बळीराजाला त्याच्या शेतमालाला योग्य भाव कसा मिळेल, या दिशेने प्रयत्न केले आहेत, अशी माहिती चंद्रकांत पाटील म्हणाले .

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER