येत्या काळात एकट्याला सत्तेत येण्याची संधी; फडणवीसांचे सूचक विधान

Devendra Fadnavis.jpg

वाशिम :- आगामी काळात महाराष्ट्रामध्ये एकट्याला सत्तेत येण्याची संधी तिन्ही पक्षांनी आपल्याला दिली असून, त्याचा फायदा घेणार असल्याचं मोठं विधान विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी केलं. राज्यातील पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघात झालेल्या निवडणुकीत आम्ही स्वतःच्या ताकदीवर एक जागा मिळवली. तसेच हैदराबाद इथं झालेल्या निवडणुकीतही प्रचंड मोठं यश मिळालं आहे, असंसुद्धा देवेंद्र फडणवीसांनी अधोरेखित केलं आहे.

विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हिंगोली जिल्ह्यात लग्न समारंभासाठी जात होते. त्या दरम्यान वाशीम इथं आमदार राजेंद्र पाटणी यांच्या घरी कार्यकर्त्यांसोबत बोलत होते. चार जागा फक्त दूर राहिलो आणि दक्षिणेतही आपल्याला प्रचंड मोठं यश मिळालं आहे. महाराष्ट्रात येत्या काळात एकट्याची सत्ता बसविण्याची संधी या तीन पक्षांनी दिली आहे. त्या संधीचा फायदा आपल्याला घ्यायचा आहे, असंही फडणवीस म्हणाले.

ही बातमी पण वाचा : मुख्यमंत्री असूनही शिवसेनेला एकही जागा नाही, त्यांनीही आत्मचिंतन करावं – फडणवीस

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER