इग्नूकडून एका सत्रात दोन डिग्र्या मिळवण्याची संधी

IGNOU - Degree

नवी दिल्ली : एकाच सत्रात अनुसूचित जाती व जमाती वर्गातील विद्यार्थ्यांना दोन डिग्र्या मिळण्याची संधी इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठाने उपलब्ध केली आहे. याद्वारे विद्यार्थी त्यांच्या मूळ विषयांव्यतिरिक्त इग्नूकडून इतर विषयांचा अभ्यास करू शकतील. देशातील कोणत्याही विद्यापीठात नियमित शिक्षण घेणाऱ्या अनुसूचित जाती व जमातीच्या विद्यार्थ्यांना अभ्यासासह नियमितपणे इग्नूकडून सहा महिन्यांचे प्रमाणपत्र कोर्स शिकता येईल. विद्यार्थ्यांना प्रथमच इग्नूतून विनाशुल्क शिक्षण घेण्याची संधी दिली जात आहे. यासाठी यूजीसीने परवानगी दिली आहे.

विद्यार्थी एकाच सत्रात दोन डिग्र्या घेऊ शकतात
इग्नूने (IGNOU) उपलब्ध केलेल्या संधीमुळे विद्यार्थी मूळ विषयांसोबतच इतर विषयांचाही अभ्यास करू शकतील. यामध्ये फ्रेंच भाषेतील प्रमाणपत्र, इंग्रजीचे अध्यापन प्रमाणपत्र, आरोग्यसेवा सर्वोत्कृष्ट व्यवस्थापन प्रमाणपत्र, ग्राहक संरक्षणात प्रमाणपत्र, अँटी ह्यूम ट्रॅफिकिंग इन सर्टिफिकेट, एचआयव्ही आणि कौटुंबिक शिक्षणाचे प्रमाणपत्र यासह अनेक अभ्यासक्रमांचा समावेश आहे. हे सर्व कोर्स सहा महिने कालावधीसाठी असतील. तसेच यासाठी कोणतेही शुल्क आकारण्यात येणार नाही.

एकूण ८४ अभ्यासक्रमांचा समावेश
प्रादेशिक संचालक अभिलाष नायक यांच्या माहितीनुसार एकूण ८४ प्रमाणपत्र कोर्स इग्नूमार्फत चालवले जात आहेत, ज्यात अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांकडून कोर्ससाठी कोणतेही शुल्क आकारण्यात येणार नाही. या सर्व अभ्यासक्रमांपैकी ३१ अभ्यासक्रम पाटणा येथे घेण्यात येत आहेत. असे केल्याने विद्यार्थ्यांना नवीन गोष्टी शिकण्याची संधी मिळेल. त्यामुळे त्यांचा बौद्धिक विकास होण्यास मदत होईल.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER