विधानपरिषदेसाठी शिवसेनेकडून उर्मिला मातोंडकर, नितीन बानुगडे यांना संधी

CM Uddhav Thackeray - Urmila Matondkar - Nitin Banugade

मुंबई : महाविकास आघाडीने (Mahavikas Aghadi) राज्यपाल नियुक्त १२ सदस्यांच्या नावाची यादी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Governor Bhagat Singh Koshyari) त्यांच्याकडे सोपवली आहे. या यादीतील काही नावं प्रसारमाध्यमांकडे आली आहेत. राज्य मंत्रिमंडळाच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत शिक्कामोर्तब केल्यानंतर महाविकास आघाडीच्या नेत्यांनी ही यादी राज्यपालांकडे सुपूर्द केली. एकनाथ खडसे (Eknath Khadse), सचिन सावंत (Sachin Sawant), रजनी पाटील (Rajni Patil) या उमेदवारांची नावं यादीत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

शिवसेनेकडून पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) कोणाला विधानपरिषदेवर पाठवणार याबाबत उत्सुकता होती. शिवसेनेनेही आपले चार उमेदवार ठरवले असून, ही नावं बंद लिफाफ्यातून राज्यपालांकडे सोपवण्यात आली. या नावांबाबतची माहिती टीव्ही 9 मराठीने दिली आहे.

शिवसेनेकडून अभिनेत्री उर्मिला मातोंडकर (Urmila Matondkar) यांना विधानपरिषदेवर पाठवण्यात येणार आहे. तर याशिवाय सेनेचा बुलंद आवाज आणि शिवव्याख्याते नितीन बानुगडे पाटील यांनाही सेनेने विधानपरिषदेवर पाठविण्याचा निर्णय घेतला आहे. आणखी दोन नावांमध्ये विजय करंजकर आणि चंद्रकांत रघुवंशी यांचा समावेश आहे.

१२ सदस्यांमध्ये काँग्रेसची चार नावं कोणती?

१) सचिन सावंत – सहकार आणि समाजसेवा
२) रजनी पाटील – सहकार आणि समाजसेवा
३) मुजफ्फर हुसैन – समाजसेवा
४) अनिरुद्ध वणकर – कला

राष्ट्रवादी काँग्रेस

१) एकनाथ खडसे
२)राजू शेट्टी – सहकार आणि समाजसेवा
३) यशपाल भिंगे – साहित्य
४) आनंद शिंदे – कला

शिवसेना उमेदवार

१)उर्मिला मातोंडकर
२) नितीन बानगुडे पाटील-
३) विजय करंजकर-
४) चंद्रकांत रघुवंशी

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER