दोन ऋतुंचा संधि – योग्य काळजी महत्त्वाची !

दोन ऋतुंचा संधि - योग्य काळजी महत्त्वाची

एक ऋतु बदलून दुसरा ऋतु सुरु होत असतांना शरीरात व वातावरणात अनेक बदल घडत असतात. एका ऋतुच्या तापमानाशी शरीर अंगवळणी पडलेले असते व ऋतु बदल सुरु झाला की बदलत्या तापमानाचा परीणाम शरीरावर होऊ लागतो. या दरम्यान योग्य काळजी घेतली की बदलत्या वातावरणामुळे आजार शरीरात उत्पन्न होत नाहीत. आयुर्वेदात, आधीच्या ऋतुचा शेवटचा आठवडा व दुसऱ्या ऋतुचा पहिला आठवडा असे मिळून २ सप्ताहांना ऋतुसंधि काल म्हटले आहे.

अचानक चालू ऋतुच्या आहार विहाराचा त्याग व नवीन ऋतुचा आहारविहार सुरु केल्यास रोग निर्माण होतात. उदाहरणार्थ थंडीचा ऋतु असल्यास उत्तम तूपाचे पदार्थ जड गोड पदार्थ, अधिक व्यायाम, गरम कपडे घालणे हे सुरु असते परंतु उष्णता वाढली लगेच थंड पदार्थ थंड जागा किंवा थंड पाणी पिऊ नये. त्यामुळे हमखास रोग होतात. वातावरणातील हे बदल शरीराला सवयीचे नसल्याने असात्म्यामुळे व्याधी होतात.

सध्या आपण अनुभवत आहोत की सकाळ संध्याकाळ बोचरी थंडी, थंड वारा असतो दिवसा मात्र गरमी होते. त्यामुळे लगेच एसी थंड सरबत पाणी सुरु केल्यास त्रास नक्कीच होणार. आचार्यांनी १५ दिवसाचा ऋतुसंधि काळ सांगितला आहे. त्यावेळेस क्रमाक्रमाने पूर्वीच्या ऋतुचा आहार विहार कमी करत जावे व दुसऱ्या ऋतुचा विधी क्रमाने व्यवहारात आणावा. आपण ज्या भागात, प्रदेशात राहतो त्या त्या वातावरणाप्रमाणे ऋतुचर्येचे पालन करणे आवश्यक ठरते. त्यानुसार आहार विहारात बदल स्वास्थ्य टिकून राहण्याकरीता मदत करतो.

ह्या बातम्या पण वाचा :

Vaidya Sharwari Sandeep Mishal

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER