आधी परीक्षा न देता आलेल्यांना बुधवारी पुन्हा ‘नीट’ची संधी 

SC-NEET

नवी दिल्ली: देशभरातील वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या प्रवेशांसाठी घेतली जाणारी ‘नॅशनल अलिजिबिलिटी कम एन्ट्रन्स टेस्ट’ (NEET ) परीक्षा ज्यांना कोरोनाच्या निर्बधांमुळे किंवा ‘कन्टेनमेंट क्षेत्रा’त राहात असल्याने देता आली नाही त्यांच्यासाठी येत्या १४ ऑक्टोबर रोजी पुन्हा एकदा परीक्षा आयोजित करावी, असा आदेश सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court)सोमवारी दिला.

नियमित ‘नीट’ परीक्षा १३ सप्टेंबर रोजी झाली होती. परंतु ज्यांना कोरोनाची लागण झाली आहे किंवा जे ‘कन्टेनमेंट झोन’मध्ये राहतात अशा उमेदवारांना परिक्षेला बसू दिले गेले नव्हते. सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी अशा उमेदवारांसाठी १४ ऑक्टोबर  रोजी परीक्षा देण्याची अनुमती द्यावी, अशी विनंती केली. सरन्यायाधीश न्या. शरद बोबडे, न्या. ए.एस. बोपण्णा व न्या. व्ही. रामसुब्रह्मण्यम यांच्या खंडपीठाने तशी परवानगी दिली.

आधी घेतलेल्या परिक्षेचा निकाल १६ ऑक्टोबर रोजी रोजी जाहीर केला जायचा आहे. आता आधीच्या व आता घेतल्या जाणार्‍याया अशा दोन्ही परिक्षांचे निकाल त्या दिवशी एकदमच जाहीर केले जावेत, असे न्यायालयाने स्पष्ट केले.

आधी मेमध्ये होणारी ही परीक्षा सप्टेंबरपर्यंत कोरोना महामारीमुळे पुढे ढकलली गेली होती. अजूनही महामारीचा जोर कमी झालेला नसल्याने ती आणखी पुढे ढकलावी, अश मागणी करणाºया याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या होत्या.

‘नॅशनल टेस्टिंग एजन्सी’ (NTE) ही परीक्षा घेते. १९ सप्टेंबर रोजी घेतलेल्या परिक्षेला नोंदणी केलेल्या १५.९७ लाख उमेदवारांपैकी ८८ टक्के उमेदवारांनी परीक्षा दिली, असे ‘एनटीए’ ची आकडेवारी सांगते. मात्र परिक्षा न दिलेल्या १२ टक्क्यांमधये कोरोना संसर्ग झाल्याने  किंवा ‘कन्टेनमेंट झोन’मध्ये राहात असल्याने परीक्षा न देता आलेले उमेदवार नेमके किती हे लगेच समजू शकले नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER