शिवसेनेकडून औरंगाबाद महापालिका निवडणुकीत नव्या दमाच्या चेहऱ्यांना संधी

Shiv Sena Aurangabad Municipal Election

औरंगाबाद :- आगामी औरंगाबाद महापालिका निवडणुकीसाठी (Aurangabad Municipal Election) शिवसेनेने (Shivsena) मोर्चेबांधणीला सुरूवात केली आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री सुभाष देसाई (Subhash Desai) यांनी आतापासूनच कामाला सुरूवात केली असून, या निवडणुकीत शिवसेना नव्या चेहऱ्यांना संधी देण्यावर शिक्कामोर्तब झाल्याची माहिती देसाई यांनी दिली. तसेच येत्या मार्च किंवा एप्रिलमध्ये ही निवडणूक होईल, असे संकेतही देसाई यांनी दिले. या निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्यापूर्वी सिडकोतील लीजवरील घरे फ्री होल्ड करण्याचा निर्णय होईल, असे त्यांनी संपादकांसोबत झालेल्या चर्चेत सांगितले.

शिवसेनेचे वरिष्ठ नेते औरंगाबादेतील बुद्धिवंत, उद्योजक, पत्रकारांशी सातत्याने चर्चा करताना दिसत आहेत. या प्रश्नावर ते म्हणाले की, निवडणुका लवकरच होणार आहे. कोरोना (Corona) काळात विकास कामे रखडली मात्र आता या कामांना गती देण्यात आली आहे हे नजरेस आणून देणे, हा या मागचा हेतू आहे. आगामी निवडणुकीत शिवसेनेकडून नवे चेहरे दिसतील, असे संकेत देताना ते म्हणाले की, नेहमीच्या चेहऱ्यांच्या पलीकडे बघायला हवे. जुन्या नेत्यांना किती दिवस बघत राहणार, असे सूचक विधान त्यांनी केले.

भाजप आणि काँग्रेस, राष्ट्रवादी या दोघांबरोबरच्या युतीमध्ये आणि कार्य पद्धतीत काय फरक आहे, या प्रश्नावर त्यांनी सांगितले की, सगळे सारखेच असतात. सत्तेची सूत्रे कोणाच्या हाती आहेत ते महत्त्वाचे ठरते. आता ती आमच्याकडे आहेत. भाजपच्या कार्यकाळात उद्योगांशी परस्पर सहकार्यांचे करार मोठ्या संख्येत झाले; पण अगदी बोटावर मोजावे इतके उद्योग आले; कारण हा करार एक सोहळा असायचा. उद्योगाची गुंतवणुकीची ऐपत तपासली जात नव्हती. आता जेवढे करार झाले ते उद्योग येतील. ‘टेस्ला’ या बहुचर्चित उद्योगाने बंगळुरूत उद्योग उभा करण्याचा निर्णय घेतला, हे वृत्त सत्य नाही, अशी माहितीही त्यांनी दिली.

दरम्यान, सरकारमध्ये राष्ट्रवादीचे नेते अजित पवारांचा (Ajit Pawar) वरचष्मा दिसतो. या प्रश्नावर त्यांचा डॉमिनन्स दिसत असला तरी प्रत्यक्षात तो नाही, असे म्हणत वेळ मारून नेली.

ही बातमी पण वाचा : वरळीच्या जागेसाठी शिवसेनेची काँग्रेससोबत फिक्सिंग ; संभाजी पाटलांचा आरोप

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER