आम्ही नाटक कंपनी असलो तरी… नीलम गोऱ्हेंनी विरोधकांना दिले चोख प्रत्युत्तर

Neelam Gorhe & Devendra Fadnavis

मुंबई : औरंगाबादचे नामांतर करण्याच्या मुद्द्यावरून सध्या राजकीय वर्तुळात वादंग पेटले आहे . यावरून माजी मुख्यमंत्री आणि विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी शिवसेना (Shivsena) व काँग्रेसवर टीका केली असून ही नाटक कंपनी असल्याचे म्हटले आहे. त्यांच्या या टीकेला विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे (Neelam Gorhe) यांनी उत्तर दिलं आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे योग्य वेळी निर्णय घेतील, असेही त्या म्हणाल्या आहेत. पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या.

सरकारवर टीका करणे  हेच विरोधी पक्षाच्या नेत्यांचे काम आहे. जर त्यांनी टीका केली नाही तर ते नाटक कंपनीतीलच एक पात्र आहेत का, अशी शंका वाटेल. प्रेक्षक म्हणून ते चांगली भूमिका निभावत आहेत. आमच्या भूमिकेवर शंका घेण्याची आवश्यकता नाही. त्यांना धक्का बसला आहे. मी परत येईन ऐवजी आता परत जायची वेळ आली आहे, असे उत्तर नीलम गोऱ्हे यांनी फडणवीसांच्या टीकेला दिले. औरंगाबादचे संभाजीनगर मुळात हा विषय वादाचा नाही. संभाजीनगरचा प्रस्ताव आधीच ठेवलेला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे शिवसेनेचे प्रमुखही आहेत.

महाविकास आघाडीतील घटक, संभाजीनगरच्या स्थानिक जनतेला विश्वासात घेऊन योग्य वेळी योग्य निर्णय घेतला जाईल यामध्ये शंका नाही. पण काही लोक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. पुणेकरांनी विद्यापीठाचे नामांतर आनंदाने स्वीकारले होते. मी उपसभापती असल्याने पुण्याच्या नामांतराबाबत कोणतीही एक भूमिका घेऊ शकत नाही, असे नीलम गोऱ्हे यांनी म्हटले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER