नक्षलवाद्यांविरोधात ‘ऑपरेशन प्रहार-3’; ८ नक्षली कमांडर सुरक्षा दलाच्या रडारवर

Opration Prahar 3 - Mahrastra Today

बिजापूर : छत्तीसगडच्या बिजापूर येथे नक्षलवाद्यांशी झालेल्या चकमकीत २२ जवान शहीद झाले. यामुळे नक्षलवाद्यांविरोधात ऑपरेशन प्रहार-३ अभियान हाती घेतले जाणार आहे. यात नक्षलवाद्यांचे टॉप ८ कमांडर रडावर आहेत.

सूत्रांच्या माहितीनुसार, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी नक्षलवाद्यांविरोधातील मोहीम अधिक गतीमान करण्याचे आदेश दिले आहेत. त्यासाठी ह्युमन इंटेलिजन्स आणि टेक्निकल इंटेलिजन्सचे मदत घेण्याचेही आदेश दिले आहेत. तसेच एनटीआरओ सुरक्षा एजन्सीची रिअल टाईम माहिती देऊन मदत केली जाणार आहे.

हिडमा रडारवर

सुरक्षा यंत्रणा आता मोस्ट वाँटेड नक्षली कमांडरची यादी करणार आहे. यावर लवकरच त्यांच्या विरोधात मोहीम हाती घेणार आहे. ऑपरेशन प्रहार-३ नुसार नक्षलवाद्यांचा बिमोड करण्यात येईल. सुरक्षा दलाने काही टॉप नक्षलवाद्यांचीही यादी बनवली आहे. या यादीत पीएलजीए-१ चा सर्वात मोठा कमांडर हिडमाचाही समावेश आहे. हिडमा हा सुकमाच्या जंगलात लपून सुरक्षा दलाच्या जवानांना टार्गेट करत असल्याचे सांगितले जात आहे.

८ नक्षलवादी कमांडर

हिडमा, कमलेश ऊर्फ लछू, साकेत, मंगेसजी, रामजी, सुखलाल आणि मलेश हे सर्वजण नक्षल्यांच्या विविध गटांचे कमांडर आहेत. हेच लोक सुरक्षा दलावर हल्ला करण्याची योजना आखत असतात. तसेच तरुणांना नक्षलवादी चळवळीकडे आकर्षित करण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे या ८ टॉप कमांडरची सुरक्षा दलाने यादी तयार केली आहे. यांच्याविरोधात लवकरच मोठी मोहीम हाती घेतली जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button