कर्नाटकातील ‘ऑपरेशन लोटस’ची चौकशी होणार; येडियुरप्पांना झटका

yediyurappa - Maharastra Today

बेंगळुरू :- कर्नाटकातील बहुचर्चित ‘ऑपरेशन लोटस’प्रकरणी मुख्यमंत्री बी. एस येडियुरप्पा यांना बेंगळुरू हायकोर्टाने झटका दिला आहे. या प्रकरणाची चौकशी करण्यास कोर्टाने परवानगी दिली आहे. त्यामुळे येडियुरप्पा यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. जनता दल सेक्युलरचे नेते नगन गौडा यांचे चिरंजीव शरण गौडा यांनी या प्रकरणी एफआयआर रद्द करण्यासाठी याचिका दाखल केली होती. कोर्टाने हा एफआयआर रद्द करण्याची मागणी करणारी याचिका फेटाळून लावली आहे.

ऑडिओ क्लिपने खळबळ

कर्नाटकातील काँग्रेस-जेडीएस सरकार पाडण्यासाठी २०१९मध्ये भाजप नेते येडियुरप्पा यांनी ‘ऑपरेशन लोटस’च्या माध्यमातून षडयंत्र रचल्याचा येडियुरप्पा यांच्यावर आरोप आहे. याबाबत एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. वडिलांना राजीनामा द्यायला सांग किंवा पक्ष सोडायला सांग, असे येडियुरप्पा एका आमदाराच्या मुलाला सांगत असल्याची ऑडिओ क्लिप व्हायरल झाली होती. त्यामुळे या ऑडिओ क्लिपची खळबळ उडाली होती. २०१९ मध्ये सरकार पाडण्यासाठी भाजपने षडयंत्र रचले होते, असा दावा काँग्रेस आणि जेडीएसने केला होता. या प्रकरणाची न्यायिक चौकशी करण्याची मागणीही या दोन्ही पक्षांनी केली होती. २०१८ मध्ये त्रिशंकू विधानसभा अस्तित्वात आल्यानंतर काँग्रेस-जेडीएसने एकत्र येऊन सत्ता स्थापन केली. त्यानंतर २०१९ मध्ये सत्ताधारी आघाडीतील काही आमदार भाजपला येऊन मिळाले होते. त्यामुळे राज्यात येडियुरप्पा यांच्या नेतृत्वात सरकार बनवण्यात आले होते. ‘ऑपरेशन लोटस’द्वारेच आमचे सरकार पाडले, असा आरोप काँग्रेसने केला होता. तर येडियुरप्पा यांनी हे सर्व आरोप फेटाळून लावले होते.

कर्नाटक विधानसभा निवडणूक

कर्नाटक विधानसभेच्या २२४ जागांसाठी २०१८ मध्ये निवडणुका झाल्या. या निवडणुकीत भाजप १०४, काँग्रेस ८० आणि जेडीएसला ३७ जागा मिळाल्या होत्या. यात भाजप पहिल्या क्रमांचा पक्ष ठरला, मात्र काँग्रेस आणि जेडीएस एकत्र येऊन त्यांनी सत्ता स्थापन केली. तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या जेडीएसचे कुमारस्वामी मुख्यमंत्रिपदी विराजमान झाले. राज्यात बहुमतासाठी ११३ जागांची गरज आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button