सोनिया, पवार आणि उद्धव ठाकरे सोबत असेपर्यंत ‘ऑपरेशन कमळ’ अशक्य : हसन मुश्रीफ

Sonia Gandhi - Sharad Pawar - Uddhav Thackeray - Hasan Mushrif

कोल्हापूर : ‘जोपर्यंत सोनिया गांधी (Sonia Gandhi), शरद पवार (Sharad Pawar) आणि उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) सोबत आहेत तोपर्यंत महाराष्ट्रात भाजपाचे (BJP) ‘ऑपरेशन कमळ’ (Operation Lotus) शक्य होणार नाही. आमदार फुटलाच तर त्याचं डिपॉझिट जप्त होईल, त्यामुळे महाविकास आघाडीचे हे सरकार १५ नव्हे, २५ वर्षे टिकेल, असे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) म्हणाले.

पुणे पदवीधर व शिक्षक मतदारसंघातील महाविकास आघाडीचे (Mahavikas Aghadi) उमेदवार अरुण लाड व प्रा. जयंत आसगावकर यांच्या प्रचारासाठी कोल्हापुरात महाविकास आघाडीच्या मेळाव्यात उच्च शिक्षणमंत्री उदय सामंत (Uday Samant) म्हणालेत – महाविकास आघाडीचे सरकार राज्यात कायम ठेवण्यासाठी शिवसेना (Shiv Sena) सोबत आहे. काँग्रेसच्या (Congress) नेत्यांनाही कायम सोबत ठेवा. त्यानंतर मुश्रीफांनी हाच धागा पकडत पुढे टोलेबाजी केली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER