राजस्थानमध्ये पुन्हा ‘ऑपरेशन लोटस’? मुख्यमंत्री गहलोत यांचा आरोप

Ashok Gehlot

जयपूर :- राजस्थानमध्ये सरकार पाडण्याचा खेळ भाजपाकडून पुन्हा सुरु होणार असा आरोप राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी केला आहे. गहलोत यांनी सांगितले की, केंद्रीय मंत्री अमित शाह (Amit Shah) आणि धर्मेंद्र प्रधान यांनी काँग्रेसच्या बंडखोर आमदारांची भेट घेऊन त्यांना राजस्थानमधील काँग्रेस सरकार पाडण्यास सांगितलं आहे, असा दावा अशोक गहलोत (Ashok Gehlot) यांनी केला.

मुख्यमंत्री अशोक गहलोत म्हणाले, जुलै महिन्यात राजस्थानात फोडाफोडी करुन सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न भाजपाने केला. त्यावेळी काही आमदार त्यावेळी गृहमंत्री अमित शाह यांना भेटले होते. त्यांचं त्यावेळचं वर्तन पाहून काँग्रेसच्या आमदारांना त्यांच्याबद्दल लाज वाटली. आपल्या देशाने एक काळ असा पाहिला की त्यावेळी आपल्या देशाचे गृहमंत्री हे सरदार पटेल (Sardar Patel) होते आणि आज अमित शाह\ यांच्यासारखा माणूस आहे.

काँग्रेस आमदारांसोबत झालेल्या बैठकीत भाजपने त्यांना राजस्थान सरकार पाडण्याचं आश्वासन दिलं. यावेळी अमित शाह म्हणाले मी पाच वेगवेगळे सरकारं पाडली आहेत आणि आता राजस्थानचं सरकार पाडत आहे. हे माझ्यासाठी भूषणावह आहे, असा दावा अशोक गहलोत यांनी केलाय. अमित शाह यांनी काँग्रेस आमदारांसोबत १ तास चर्चा केली. भाजप अजूनही राजस्थान सरकार पाडण्यासाठी प्रयत्न करत आहे, असाही आरोप गहलोत यांनी केला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER