तेल लावलेला पहिलवान : रात्री ऑपरेशन तर सकाळी कार्यात मग्न; हीच पवारांची ओळख

Maharashtra Today

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावर काल रात्री उशिरा मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात (Breach Candy Hospital) शस्त्रक्रिया करण्यात आली होती. यानंतर शरद पवार यांची कन्या आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी ट्विटर अकाउंटवरून शरद पवार यांचे छायाचित्र शेअर केले आहे. यामध्ये शरद पवार वर्तमानपत्र वाचताना दिसत आहेत. विशेष म्हणजे रात्री अर्धा तासाचे ऑपरेशन झाल्यावरही शरद पवारांनी आपल्या आवडत्या कार्याला प्राथमिकता दिली  आहे. नेहमीप्रमाणे त्यांनी सकाळी उठून वर्तमानपत्रे चाळली.

शरद पवार (Sharad Pawar) यांच्यावर मंगळवारी रात्री मुंबईच्या ब्रीच कँडी रुग्णालयात शस्त्रक्रिया पार पडली. एन्डोस्कोपीद्वारे शरद पवार यांच्या गॉल ब्लॅडरमधील मोठा स्टोन बाहेर काढण्यात आला. त्यामुळे आता शरद पवार यांना पोटदुखीचा त्रास होणार नाही. मात्र, त्यांच्या  गॉल ब्लॅडरवरही आणखी एक शस्त्रक्रिया करण्याची गरज आहे. ही शस्त्रक्रिया नक्की कधी करायची, याचा निर्णय अद्याप डॉक्टरांनी घेतलेला नाही. मात्र, आता शरद पवार यांची प्रकृती पूर्णपणे स्थिर आणि चांगली आहे. याबाबत सुप्रिया सुळे यांनी ट्विट करत माहिती दिली.

सुप्रभात, ब्रीच कँडी रुग्णालयातील सर्व डॉक्टर्स,परिचारिका आणि सपोर्टिंग स्टाफ यांचे मनापासून आभार. ही आजची प्रसन्न सकाळ आहे आणि आदरणीय पवारसाहेब त्यांचं रोजचं सर्वांत  आवडतं काम अर्थात वर्तमानपत्रांचं वाचन, करीत आहेत, अशी माहिती सुळे यांनी दिली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button