कोरोना : वकिलांना लोकलमध्ये प्रवासाची परवानगी देता येणार नाही – उच्च न्यायालय

Mumbai Local - Lawyer - Bombay High Court

मुंबई : कोरोनाची (Corona) सध्याची स्थिती लक्षात घेता वकिलांना लोकलमध्ये प्रवास करण्याची परवानगी देता येणार नाही. अजून सोशल डिस्टंसिंगचे (Social Distancing) पालन करा, सल्ला उच्च न्यायालयाने (High Court) दिला आहे. याबाबत वकिलांनी जनहित याचिका दाखल केली होती.

याचिकेत म्हटले होते की, न्यायालयाच्या कामासाठी वकील आणि त्यांच्या पंजीकृत लिपीकांना लोकलने प्रवास करण्याची परवानगी द्यावी. मुख्य नायायाधीश दिपंकर दत्ता आणि न्यायमूर्ती गिरीश कुळकर्णी यांच्या खंडपीठाने म्हटले की – अशी परवानगी दिली तर कोरोनाचे रुग्ण वाढून आरोग्य व्यवस्थेवर ताण येईल.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER