मंदिर उघडणे : भावना भडकवून उद्रेक करणे चूक; वारकरी साहित्य परिषद

Vittal Patil

मुंबई : मंदिर सुरु व्हावीत ही सर्वांचीच इच्छा आहे. मात्र, त्यासाठी सर्वसामान्यांच्या भावना भडकावून उद्रेक करणे चूक आहे, असे वारकरी साहित्य परिषदेचे अध्यक्ष विठ्ठल पाटील (Vittal Patil) म्हणालेत.

मंदिरं उघडण्याच्या मुद्द्यावरुन राज्यात विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये राजकीय संघर्ष निर्माण झाला आहे. मुंबईत माध्यमांशी बोलताना पाटील म्हणालेत – राज्यात मंदिर सुरु व्हावीत अशी सर्वांचीच इच्छा आहे. पण, मंदिर उघडण्यावरुन राजकीय पक्षांनी वारकरी संप्रदायाच्या नावाने राजकारण करु नये. वारकरी सांप्रदायातील लोकांनीसुद्धा राजकीय लोकांसोबत जाऊन प्रक्षोभक वक्तव्य टाळावे.

दारुची दुकान आणि मंदिर यांची तुलना होते आहे. राज्यात दारुची दुकान सुरु झाली; मग मंदिर का सुरु केली जात नाहीत, असा सवाल सरकारला विचारला जात आहे. त्यावर पाटील म्हणालेत, मंदिरात लहान-थोर, महिला-पुरुष सगळेच आत्मशांतीसाठी येतात. दारु पिणारे मोजकेच आहेत. दारुचे दुकान आणि मंदिराची तुलना होऊ शकत नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER