आॕनलाईन जिंकणाऱ्या बुध्दिबळपटूचे पटावर खेळताना पितळ उघडे!

Maharashtra Today

कोरोनामुळे जवळपास अख्खे विश्वच आॕनलाईन झालेले असताना आणि वर्क फ्राॕम होम सुरू असताना बुध्दिबळानेसुध्दा (Online Chess) मोठ्या प्रमाणावर हे तत्व अंगिकारले आहे. बुध्दिबळासारख्या खेळाला हे पोषकही आहे पण प्रत्येक गोष्टीचे फायदे असतात तसे तोटेसुध्दा असतात. त्याप्रमाणे कोरोना काळात आॕनलाईन प्रणालीने बुध्दिबळ आणखी जास्त लोकांपर्यंत पोहोचले असले तरी आॕनलाईन फसवणूकीचे व बदमाशीचे (Cheating) प्रमाणही वाढले आहे. सर्वच खेळाडू प्रामाणिक नसतात आणि प्रगत तंत्रज्ञानाने आॕनलाईन पध्दतीत खेळाडूंच्या हालचालींवर नियंत्रण राखणे केवळ अवघड असते. त्यामुळे अगदी कमी रेटींग असणारा खेळाडूसुध्दा चांगले रेटींग असणाऱ्या अनुभवी खेळाडूविरुध्द चांगला खेळत असल्याचे आश्चर्यचकित करणारे प्रकार दिसून आले आहे.

चकित करुन सोडणारे हे खेळाडू खरोखरच चांगले खेळतात की गैरमार्गाचा अवलंब करतात याची जगाला पडताळणी करून देण्यासाठी अलीकडेच एक संशयीत खेळाडू, इंडोनेशियाचा (Indonesia) दादांग सुबूर (Dadang Subur) आणि इंटरनॅशनल मास्टर आयरीन सुकंदर (International Master Irene Sukundar) यांच्यात एक लढत खेळली गेली आणि जगभरातील साडेबार लाख लोकांनी ती आॕनलाईन पाहिली. बुध्दिबळाच्या एखाद्या डावाला लाभलेले हे विक्रमी दर्शक होते.

दादांग सुबुरने अलीकडच्या काळात खेळात अविश्वसनीय प्रगती दर्शवली आहे. तो आॕनलाईन जेवढा चांगला खेळतो तसाच खेळ प्रत्यक्ष पटावरही त्याचा होतो का हे बघण्यासाठी ‘चिटर’ विरुध्द ‘चॕलेंजर’ असा असे तीन डाव 22 मार्चला खेळण्यात आले आणि त्याला अपेक्षेप्रमाणे बुध्दिबळ इतिहासातील सर्वाधिक प्रेक्षक लाभले. जागतिक बुध्दिबळ नियंत्रण संस्था ‘फिडे’ ने या विक्रमाची पुष्टी केली आहे. अपेक्षेप्रमाणे सुबूर या लढतीचे तिन्ही डाव हरला आणि हे स्पष्टच झाले की तो गैरमार्ग वापरुन फसवणूक करत होता.

ह्याची सुरुवात अशी झाली की, 2 मार्च रोजी सुबुरने आॕनलाईन खेळताना इंटरनॅशनल मास्टर लेव्ही रोझमान (Levy Rozman) याला पराभूत केले. रोझमान हा बुध्दिबळाचा सुप्रसिध्द लाईव्ह स्ट्रिमर असून त्याच्या गोथमचेस या चॕनेलचे 7 लाख 87 हजार दर्शक आहेत. सुबूरकडून अनपेक्षितरित्या पराभव पत्करावा लागला त्यावेळी त्याने डावादरम्यान हरकतीचा लाल झेंडा दाखवला होता. दादांग सुबूर ज्या नावाच्या अकाउंटने आॕनलाईन खेळत होता त्या ‘देवा किपास’ अकाउंटबद्दलही रोझमानने चेस डॉट कॉमकडे तक्रार केली होती. त्यानंतर चेस डॉट काॕमने देवा किपास अकाउंट ब्लॕकलिस्टसुध्दा केले होते. यानंतर सुबूरच्या मुलाने आपल्या वडिलांच्या समर्थनात ‘फेसबूक’वर एक पोस्टसुध्दा टाकली होती. रोझमानला सोशल मीडियावर धमक्या मिळायला लागल्या होत्या. त्याला तिरस्कारपूर्ण संदेश यायला लागले होते. पण ही परिस्थिती प्रत्यक्ष पटावर जेंव्हा सुबूर आणि आयरीनदरम्यान डाव खेळले गेले आणि त्याता सुबूर पराभूत झाला त्यानंतर बदलली. त्यानंतर रोझमान योग्य असल्याचे आणि त्याला समर्थन देणारे संदेश यायला लागले. त्यात कितीतरी भारतीयसुध्दा असल्याचे त्याने म्हटले आहे.

25 वर्षीय रोझमानने पाहिले की सुबूरचे रेटिंग तर चांगले आहे पण त्याच्या नावावर एकही विजेतेपद नाही हे बघून त्याला संशय आला. देवा किपास हे अकाउंट महिनाभरापूर्वीचेच होते. पण त्याने जवळपास 80 टक्के डाव जिंकले होते. त्याचे ब्लिट्झ प्रकारातील रेटिंग 1100 होते आणि दोन आठवड्यातच त्याने 900 गूण कमावले होते. तो प्रत्येक चालीला, अगदी सोप्या व स्पष्ट वाटणाऱ्या चालींनासुध्दा 10 सेकंद वेळ घेत होता याचा अर्थ तो कुठलेतरी सर्च इंजिन वा इतर मार्गाने त्याला कोणती चाल खेळायची याचा क्ल्यू मिळायची वाट बघत होता असे वाटत हौते असे रोझमानने म्हटले आहे.

आयरिन सुकंदर हिला सुबूरवरील विछयासाठी 14 हजार डॉलर मिळाले तर चिटर’ असूनही सुबूरला 7 हजार डाॕलर मिळाले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button