नवरात्र उत्सवासाठी अंबाबाई मंदिर उघडा : देवस्थान समिती

Ambabai Temple

कोल्हापूर :- कोरोनामुळे गेली पाच महिने बंद असलेले अंबाबाई मंदिर (Ambabai Temple) शारदीय नवरात्र उत्सवासाठी सुरू करण्याची मागणी पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीने शासनाकडे केली आहे. १८ ऑक्टोबरपासून नवरात्र उत्सव सुरु होणार आहे. नवरात्रीच्या तयारीसाठी महिनाभर अगोदर मंदिरात तयारी करावी लागते. नवरात्रीनिमित्त कोल्हापुरला सुमारे दहा लाख भाविक भेट देतात.

महिनाभर अगोदर मंदिराची सर्व स्वच्छता आदीसह तयारी केली जाते. आतापासून मंदिर उघडण्यासाठी परवानगी दिली तरच ही तयारी पूर्ण होणार आहे. पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीने चार दरवाज्यापैकी एकच दरवाजा खुला करु. शासकीय नियम आणि अटीनुसारच घटस्थापना आणि नवरात्र उत्सव साजरा केला जाईल. मोजक्या भाविकांना मास्क आणि सॅनिटायझरसह प्रवेश दिला जाईल, अशी ग्वाही देवस्थान समितीने राज्य शासनाला दिली आहे. कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर रोज येणाऱ्या दोन लाख भाविकांच्या संख्येवर मर्यादा कशा घालणार हा खरा सवाल आहे. अंबाबाई आणि जोतीबाच्या दर्शनासाठी संपूर्ण महाराष्ट्र, कर्नाटक आणि आंध्रप्रदेशातून भाविक येत असतात. राज्य शासन फक्त अंबाबाई मंदिरापुरता वेगळा निर्णय घेवू शकत नाही. त्यामुळे मंदिर खुले करण्यासाठी यानिमित्ताने परवानगी मिळणा काय याकडे भक्तांचे लक्ष लागले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER