१ तारखेपासून सर्व दुकाने उघडा, लॉकडाऊनवरून प्रकाश आंबेडकर आक्रामक

Prakash Ambedkar

औरंगाबाद : वंचित बहुजन आघाडीचे (VBA) नेते प्रकाश आंबेडकर (Prakash ambedkar) यांनी पुन्हा एकदा लॉकडाऊनविरोधात आक्रमक पवित्रा घेतला आहे. ‘लॉकडाऊन (Lockdown) मान्य करू नका. १ तारखेपासून राज्यातील सर्व दुकाने उघडा,’ असं आवाहन त्यांनी राज्यभरातील दुकानदारांना केलं आहे. ‘हवं तर मला अटक करा. माझ्यावर गुन्हा दाखल करा, मी घाबरणारा नाही,’ असं म्हणत राज्य सरकारलाही आव्हान दिलं.

ह्या बातम्या पण वाचा : 

‘देशात आपल्या लोकसंख्येपैकी केवळ ५ टक्के लोक कोरोनामुळे (Corona) बाधित होऊ शकतात आणि केंद्र आणि राज्य सरकार ९५ टक्के लोकांवर अन्याय करीत आहेत. येत्या १ तारखेपासून सर्वांनी आपापली सर्व दुकाने उघडून (All shops Open) व्यवहार सुरु करावेत. बकरी ईद मुस्लीम बांधवांनी मोकळेपणाने साजरी करावी आणि रक्षाबंधनही व्यवस्थित मोकळेपणाने साजरे करावं,’ असं आवाहनही प्रकाश आंबेडकर यांनी केलं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER