वन-डेमध्ये एक ते 10 क्रमांकावर फलंदाजी करणारे केवळ दोन, जाणून घ्या ते कोण?

Shoaib Malik - Shahid Afridi

कोणत्याही क्रिकेट सामन्यात 1 ते 11 नंबरचे फलंदाज असतात पण फारच थोडे फलंदाज तीन किंवा अधिक क्रमांकावर फलंदाजी करतात. सलामी फलंदाज सलामीला, मधल्या फळीतील फलंदाज 4 ते 7 क्रमांकावर आणि तळाकडील फलंदाज जे बहुधा गोलंदाज असतात ते 8 ते 11 क्रमांकावर फलंदाजी करतात. मात्र फारच थोडे फलंदाज असे असतात की जे या सर्व क्रमांकावर म्हणजे 1 ते 11 क्रमांकावर फलंदाजी करतात.

कसोटी क्रिकेटमध्ये आतापर्यंत फक्त तीनच फलंदाजांनी 1 ते 11 क्रमांकावर फलंदाजी केली आहे पण वन डे इंटरनॅशनल सामन्यांमध्ये असा एकही फलंदाज नाही ज्याने या सर्व क्रमांकावर फलंदाजी केली असेल. 1 ते 11 नाही मात्र 1 ते 10 क्रमांकावर फलंदाजी केलेले केवळ दोनच फलंदाज आहेत आणि हे दोन्ही पाकिस्तानी आहेत.

शोएब मलिक व शाहिद आफ्रिदी हे ते दोन फलंदाज आहेत. वन डे इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये 1 ते 10 क्रमांकावर फलंदाजी केलेले केवळ हे दोनच फलंदाज आहेत.

या दोघांनी वन डे इंटरनॕशनल सामन्यांमध्ये प्रत्येक क्रमांकावर खेळलेले डाव व केलेल्या धावा (क्रमाने) पुढीलप्रमाणे-

क्रम—– आफ्रिदी ——– मलिक
1 —– 16/276 ——– 9/259
2 —– 129/3267 —- 6/264
3 —– 18 /441 ——– 17/1501
4 —– 07/48 ———– 31/1093
5 —– 21/361 ——— 79/2349
6 —– 42/922 ——— 68/1647
7 —– 94/1858 ——- 14/271
8 —– 39/846 ——— 06/73
9 —– 02/29 ———– 05/62
10 — 01/16 ———– 03/15

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER