ट्रम्पच रोखू शकतात ९ – ११ सारखा हल्ला; लादेनच्या पुतणीचा दावा

Trump

वॉशिंग्टन : ‘ट्रम्पच रोखू शकतात अमेरिकेवरचा ९-११ सारखा हल्ला.’ या शब्दात दहशतवादी ओसामा बिन लादेनची पुतणी नूर बिन लादेनने अध्यक्षपदाच्या निवडणुकीत डोनाल्ड ट्रम्प यांना पाठिंबा व्यक्त केला आहे. ती दोन बहिणींसोबत स्विर्झलँडमध्ये राहते.

सध्या अमेरिकेत राष्ट्राध्यक्षाच्या निवडणुकीची धुमाळी सुरू आहे. आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. नूर बिन ही ओसामा बिन लादेनचा मोठा भाऊ यसलामची मुलगी आहे. हे कुटुंब लादेनपासून स्वतःला लांब ठेवण्यासाठी ते त्यांचे आडनाव ‘लादिन’ असे वापरतात.

न्यूयॉर्क पोस्टला दिलेल्या मुलाखतीत नूर म्हणाली की, आयएसआयएसने ओबाना आणि बाइडन यांच्या कार्यकाळात प्रसार केला आणि यूरोपर्यंत आले. ट्रम्प यांनी दाखवले की, ते अमेरिका आणि आम्हाला परदेशी धोक्यापासून वाचवू शकतात. ते हल्ल्याची संधी मिळण्याआधीच दहशतवाद्यांना संपवू शकतात. अमेरिकाच नाही तर पश्चिमी सभ्यतेसाठी महत्त्वाचे ट्रम्प निवडून येणे महत्त्वाचे.

नूर म्हणाली की, मी स्विर्झलँडमध्ये राहात असले तरी मनाने अमेरिकन आहे. २०१५ पासूनच मी ट्रम्प यांची समर्थक आहे. मी त्यांच्या संकल्पांचे कौतुक करते. ट्रम्प यांनी अमेरिकेचे राष्ट्रपती म्हणून पुन्हा निवडून यावे. हे केवळ अमेरिकाच नाही तर पश्चिमी सभ्यतेसाठी महत्त्वाचे आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER