प्रतिगामी सरकारला सत्तेबाहेर ठेवण्यासाठीच एकत्र : बाळासाहेब थोरात

Balasaheb Thorat

कोल्हापूर : महाराष्ट्रात भाजपच्या प्रतिगामी पक्षाला सत्तेबाहेर ठेवण्यासाठीच काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना एकत्र आले आहेत. सर्वसामान्य माणूस केंद्रस्थानी ठेवून कारभार सुरू आहे, असे प्रतिप्रादन काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले.

पालकमंत्री सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखाली कोल्हापूर जिल्हा काँग्रेसतर्फे काढण्यात आलेल्या भव्य ट्रॅक्टर रॅलीमध्ये ते बोलत होते. थोरात म्हणाले, दोन लाख रुपयांपर्यंत शेतकऱ्यांना कर्जमाफी देताना भाजपसारखे कागदोपत्री त्रांगडे निर्माण केले नाही. कोरोनामुळे अनेक अडचणी आहेत, तरीही लवकरच नियमित कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांना अनुदान दिले जाईल. जादा दराने कापूस खरेदीचा निर्णय, रोज १० लाख अतिरिक्त दुधाची भुकटी, महापुरात विदर्भाला आणि चक्रीवादळात कोकणाला मदत, अतिवृष्टीत नुकसान भरपाईसाठी १० हजार कोटी रुपये जाहीर केले. याउलट केंद्र सरकार कामगार आणि शेतकऱ्यांविरोधात वागत आहे. शेतकऱ्याला अडचणीत आणण्याचे काम सुरू आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER