ज्यांच्या नावाने क्रीडा संकुल, त्यांनाच नाकारला युएस ओपनठिकाणी प्रवेश

billie jean king

कोरोनामुळे (Corona) काय काय गोष्टी घडतील आणि काय काय कानावर पडेल याचा नेम नाही. आता हेच पहा ना…युएस ओपन टेनिस (US open Tennis) स्पर्धा ही वर्षातील शेवटची ग्रँड स्लॕम स्पर्धा न्यूयॉर्कमधील (New york) ज्या टेनिस संकुलात (Tennis Complex) होते त्या एकुण 34 टेनिस कोर्टच्या परिसराला महान क्रांतीकारी महिला टेनिसपटू बिली जिन किंग (Billie Jean King) यांचे नाव देण्यात आले आहे. बिली जिन किंग नॕशनल टेनिस सेंटर या नावाने हा परिसर ओळखला जातो. युएस टेनिस असोसिएशनच्या अधिपत्याखाली हा परिसर येतो आणि त्यांनाच कोरोनापायी एक अतिशय अवघड निर्णय घ्यावा लागला. तो म्हणजे ज्यांच्या नावाने हे टेनिस संकुल आहे त्या बिली जिन किंग यांनाच त्यांना आरोग्याच्या प्रश्नावरुन प्रवेश नाकारावा लागला.

किंग यांचे वय आता 76 वर्ष आहे आणि म्हणूनच वयाचा विचार करता युएस टेनिस असोसिएशनने त्यांना या परिसरात येऊ नका, आपल्याला प्रवेश देता येणार नाही असे स्पष्ट करत त्यांना बाहेरच राहण्याचा सल्ला दिला.

2006 मध्ये या टेनिस संकुलास त्यांचे नाव देण्यात आले आहे. पण आरोग्य व सुरक्षेच्या बंधनांमुळे संकुलाठिकाणी केवळ खेळाडू, खेळाडूंसोबतचा चमू आणि आवश्यक तेवढाच स्पर्धेचा कर्मचारी वृंद यांनाच प्रवेश देण्यात आला आहे, त्यात बिली यांच्याबद्दल असे काही खासकरुन म्हटलेले नाही पण सर्वसाधारण नियम असे आहेत असे युएस टेनिस असोसिएशनचे प्रवक्ते ख्रिस विडमायर यांनी म्हटले आहे.

1959 पासून बिली जिन किंग दरवर्षी या स्पर्धेला उपस्थित असतात. त्यात आता खंड पडला आहे. बीली जिन किंग यांनीसुध्दा याचा कोणताही मुद्दा न बनवता हा निर्णय मान्य केला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER