…तरच दीपिकाची या प्रकरणातून सुटका होईल; उज्ज्वल निकम यांचा महत्त्वाचा सल्ला

Deepika Padukone-Ujjwal Nigam

मुंबई : सुशांत सिंह आत्महत्या (SSR) प्रकरणात ड्रग्जचा अँगल समोर आल्यानंतर या प्रकरणात अनेक मोठे कलाकार अडकलेले दिसून येत आहेत. दीपिका पदुकोन  (Deepika Padukone) हिची  सध्या एनसीबी चौकशी करत आहेत. त्यातच ज्येष्ठ सरकारी वकील उज्ज्वल निकम (Ujjwal Nikam) यांनी दीपिकाला एक महत्त्वाचा सल्ला दिला आहे. जे ‘माल है क्या?’ हे दीपिकाचे विधान सोशल मीडियावर व्हायरल झाले होते.

दीपिकानेच हे  व्हॉट्सअप चॅटवरून विचारल्याचे पुढे  आल्यानेच दीपिका या प्रकरणात अडकली आहे. त्यामुळे अभिनेत्री दीपिका पदुकोनला माल म्हणजे ड्रग्ज नव्हे हे सिद्ध करावे लागेल, तरच तिची या प्रकरणातून सुटका होईल, असे उज्ज्वल निकम यांनी म्हटले आहे. ते म्हणाले,  व्हॉट्सअप   चॅटिंग हा डॉक्युमेंटरी पुरावा आहे.  माल है क्या? म्हणजे नेमकं काय? माल म्हणजे ड्रग्ज नव्हे हे दीपिकाला सिद्ध करावं लागेल.

दीपिका पदुकोन ही ग्रुपची एडमिन होती, असेदेखील तपासात पुढे आले आहे. तरी तिला हे सिद्ध करावे लागेल की, हे चॅटिंग ड्रग्ज संदर्भात नव्हते, असं निकम म्हणाले. तसेच, रिया चक्रवर्तीची मॅनेजर ही ड्रग्ज पेडलर असल्याने व्हॉट्सअप चॅटिंगवरून पुढील काळात दीपिकाच्या अडचणीत वाढ होऊ शकते, असंही निकम म्हणाले.

ही बातमी पण वाचा : ‘माल’ घेतला नाही तर १२ वकिलांची फौज कशासाठी? शर्लिनचा दीपिकाला टोमणा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER