मराठा समाजातील काही नेत्यांचाच आरक्षणाला विरोध : आ. चंद्रकांत पाटील

Chandrakant-Patil

कोल्हापूर : मराठा समाजातील (Maratha community) काही नेत्यांनाच मराठा समाजाला आरक्षण मिळू नये, असे वाटत असल्याचा आरोप भाजपचे (BJP) प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी आज केला. केंद्र शासनाने मंजूर केलेल्या कृषी विधेयकांबाबत भूमिका मांडण्यासाठी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत मराठा आरक्षणाच्या एका प्रश्नावर ते बोलत होते. मराठा आरक्षण प्रश्नी आता भाजप आक्रमक आंदोलन करणार आहे.

जोपर्यंत याबाबत निर्णय होत नाही, तोपर्यंत ज्या ओबीसी समाजाला सवलती मिळतात, त्या सर्व सवलती मराठा समाजाला देण्याचा निर्णय सरकारने घ्यावा. त्यासाठी पंधराशे कोटी रुपये जाहीर करावेत, अशी मागणीही त्यांनी यावेळी केली.

आ. पाटील म्हणाले, पंधरा वर्षे आघाडीचे सरकार होते. तरीही त्यांनी मराठा आरक्षणाचा कायदा केला नाही. जाता जाता जो निर्णय घेतला. तोही तकलादू होता. त्यामुळेच त्यांनी घेतलेले मराठा आरक्षणाचा निर्णय न्यायालयात त्यावेळी टिकला नाही. मराठा समाजाला नेहमीच बॅकवर्ड ठेवण्यासाठी मराठा नेते त्यांना आरक्षण देत नाहीत. कारण त्यांना या समाजाला पुढे आणायचे नाही. पोलीस भरती करताना मराठा समाजाला १३ टक्के राखीव जागा ठेवून भरती करण्याचा सरकारचा जो निर्णय आहे तो फसवाफसवी असल्याचे सांगून या सरकारचे सल्लागार तरी कोण आहे ? अशा जागा शिल्लक ठेवून भरती केल्यास उर्वरित भरती करताना केवळ मराठा समाजाची भरती करू शकत नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER